करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2024 14:04 IST2024-03-25T14:04:01+5:302024-03-25T14:04:43+5:30
प्रत्येक पार्ट्यांमध्ये आवर्जून हजर राहणारा फिल्ममेकर करण जोहर मात्र होळी पार्टीपासून चार हात लांबच असतो.

करण जोहर होळी पार्टीपासून राहतो लांब, अमिताभ बच्चन ठरले कारण; नेमका काय आहे किस्सा?
आज जिकडे तिकडे सर्वजण होळीच्या रंगात रंगले आहेत. धुळवड उत्साहात साजरी होत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही होळीचा रंग चढला आहे. प्रत्येक पार्ट्यांमध्ये आवर्जून हजर राहणारा फिल्ममेकर करण जोहर (Karan Johar) मात्र होळी पार्टीपासून चार हात लांबच असतो. यामागचं कारणही आश्चर्यकारक आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यामुळेच तो होळी पार्टीला जात नाही. एका कार्यक्रमात त्याने याबद्दल किस्सा शेअर केला होता.
एका रिएलिटी शोमध्ये करण जोहर म्हणाला होता की, "मी १० वर्षांचा होतो तेव्हा मला माझे वडील अमिताभ बच्चन यांच्या घरी होळी पार्टीसाठी घेऊन गेले होते. मला आधीपासूनच रंग खेळायला आवडत नव्हतं. हे मी पार्टीतही सगळ्यांना सांगत फिरत होतो. पण माझं म्हणणं पूर्ण व्हायच्या आतच अभिषेक बच्चनने मला पूल मध्ये ढकललं. यानंतर तर मी जास्तच घाबरलो आणि तेव्हापासून होळी पार्टीत जाणंच बंद केलं."
पूर्वीच्या काळी बॉलिवूडमध्ये राज कपूर यांच्या 'आरके स्टुडिओ' मध्ये होळी पार्टी व्हायची. कित्येक मोठमोठे स्टार्स या पार्टीत रंग खेळायचे. बॉलिवूडकरांची जत्राच इथे लागायची. शिवाय अमिताभ बच्चन यांच्या घरची होळी पार्टीही खूप चर्चेत असायची. बिग बी स्वत: आणि त्यांचे कुटुंबीय येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत त्यांना पाण्याच्या टबमध्ये ढकलून करायचे. धुळवडीची तेव्हाची धमाल काही औरच होती.