करण जोहरने लग्नाबाबत व्यक्त केली खंत; म्हणाला,"जोडीदाराची कमतरता जाणवते..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 21:20 IST2022-06-15T21:20:05+5:302022-06-15T21:20:31+5:30
Karan Johar : नुकतीच करण जोहरनं आपल्या वयाची ५० वर्षे पूर्ण केली. परंतु त्यानं अद्यापही लग्न केलेलं नाही.

करण जोहरने लग्नाबाबत व्यक्त केली खंत; म्हणाला,"जोडीदाराची कमतरता जाणवते..."
बॉलीवूडमधील सर्वात मोठा निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच. पण अनेकांना त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही जाणून घेण्यास उत्सुकता आहे. नुकतीच करण जोहरनं आपल्या वयाची ५० वर्षे पूर्ण केली. परंतु त्यानं अद्यापही लग्न केलेलं नाही. आता त्यानं आपल्याला जोडीदार मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली आहे.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करण जोहरने त्याच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं. आपल्याला आपल्या प्रोफेशनल लाईफबाबत नाही तर पर्सनल लाईफबद्दल खंत असल्याचं त्यानं सांगितलं. “मला पर्सनल आयुष्याला अधिक वेळ द्यायला हवा होता. परंतु कामाला अधिक वेळ दिला,” असं तो म्हणाला. करण जोहरने लग्न केले नसले तरी सरोगसीच्या माध्यमातून तो २०१५ मध्ये यश आणि रुही या जुळ्या मुलांचा वडिल झाला. आपले आई वडिल किंवा मुलं कधीही आपल्या आयुष्यातील जोडीदाराची कमतरता पूर्ण करू शकत नाहीत, असंही तो मुलाखतीदरम्यान म्हणाला.
आता उशिर झाला
“माझ्या आयुष्यातील ज्या गोष्टीला महत्त्व द्यायला हवं होती, त्याला मी ते दिलं नाही याची सर्वात मोठी खंत आहे. परंतु आता खुप उशिर झाला असं वाटतं. एका जोडीदाराचा शोध घेण्यासाठी आता खुप उशिर झालाय. तुमच्यासाठी एक जोडीदार जे जीवनात करू शकतो, त्याची कमतरता आई वडिल किंवा मुलं पूर्ण करू शकत नाहीत. माझ्या जीवनातील तो कप्पा रिकामा आहे आणि ही सर्वात मोठी खंत आहे,” असंही तो म्हणाला.