करण जोहरच्या सिनेमात 'हा' स्टारकिड, साऊथ सुपरस्टारचीही चर्चा; सिनेमाचं नाव गुलदस्त्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:25 IST2024-01-28T20:24:59+5:302024-01-28T20:25:52+5:30
नेटकऱ्यांनी सिनेमा आणि स्टारकास्टचा लावला शोध

करण जोहरच्या सिनेमात 'हा' स्टारकिड, साऊथ सुपरस्टारचीही चर्चा; सिनेमाचं नाव गुलदस्त्यात
बॉलिवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. मात्र त्याने थेट नाव जाहीर न करता प्रेक्षकांनाच अंदाज बांधायला सांगितलं आहे. करणने प्रेक्षकांसमोर कोडं ठेवलं आहे आणि सिनेमात कोणती स्टारकास्ट असेल याची हिंट दिली आहे. त्यामुळे करणला प्रेक्षकांना कसं व्यस्त ठेवायचं हे चांगलं जमतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. मात्र युझर्सही स्मार्ट आहेत. त्यांनीही सिनेमा आणि स्टारकास्टचा शोध लावला आहे.
करणने लिहिले, 'ही कोणत्याही फिल्मची घोषणा नाही पण तुमच्या मदतीने होऊ शकते. आम्ही गेल्या वर्षभरापासून या सिनेमावर काम करत आहोत. आम्ही याबद्दल कोणालाच सांगितलेलं नाही. अगदी फिल्मच्या क्रु मेंबर्सलाही माहिती नाही. हा निर्णय डेब्यू करणाऱ्या दिग्दर्शकाने घेतला आहे. फिल्मबद्दल काही हिंट्स-
1. असा साऊथ सुपरस्टार ज्याने नुकताचपॅन इंडिया ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आहे
2. ही सर्वांची आवडती अभिनेत्री आहे जिने तिच्या इमोशनल एनर्जीने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे
3. हा एक असा अभिनेता आहे जो पदार्पण करत आहे जो फिल्म परिवारातून येतो आणि न थकता आपली जागा मिळवण्यासाठी मेहनत करत आहे. नेपोटिझमशी लढत तो खाली मान घालून फक्त काम करत आहे.
करणची ही पोस्ट वाचून नेटकऱ्यांनीही सिनेमाचा आणि स्टारकास्टचा शोध लावला आहे. जवळपास सर्वांनीच कमेंटमध्ये सिनेमाचं नाव 'सरजमीं' असल्याचं लिहिलं आहे. तर सिनेमात साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन, अभिनेत्री काजोल आणि स्टारकिड इब्राहिम अली खान असमार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून करण जोहर आणि काजोल 12 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. तर बोमन इरानी यांचा मुलगा कायोज इरानीने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
दुसरीकडे काही जणांनी कमेंटमध्ये दीपिका, प्रभास यांच्या 'प्रोजेक्ट के' चंही नाव घेतलं आहे. तर काहींनी 'दोस्ताना 2' कमेंटमध्ये लिहिलं आहे.