पाक क्रिकेटर वसीम अकरमच्या पत्नीने कंगनाला मारला टोमणा, म्हणाली - तू मदर तेरेसा तर नाही...
By अमित इंगोले | Updated: September 23, 2020 15:08 IST2020-09-23T15:07:46+5:302020-09-23T15:08:40+5:30
अनेक कलाकार एकतर तिच्या विरोधात आहेत नाही तर तिच्याविषयी काहीच बोलत नाहीयेत. आता तर देशा बाहेरूनही कंगनाला विरोध होताना दिसतो आहे.

पाक क्रिकेटर वसीम अकरमच्या पत्नीने कंगनाला मारला टोमणा, म्हणाली - तू मदर तेरेसा तर नाही...
आपल्या वादग्रस्त विधानांमुळे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतने अनेकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. हेच कारण आहे की, इंडस्ट्रीतील एक मोठा भाग तिच्या विरोधात आहे. अनेक कलाकार एकतर तिच्या विरोधात आहेत नाही तर तिच्याविषयी काहीच बोलत नाहीयेत. आता तर देशा बाहेरूनही कंगनाला विरोध होताना दिसतो आहे.
काही दिवसांपूर्वी कंगनाने एक ट्विट केलं होतं ज्यात तिन लिहिले होते की, 'मी खूप भांडणारी मुलगी वाटू शकते. पण मी तशी नाहीये. माझा रेकॉर्ड राहिलाय की, मी कधीच भांडणाची सुरूवात केली नाही. जर कुणी हे सिद्ध करून दाखवलं तर मी ट्विटर सोडेने. मी कधीच भांडणाला सुरूवात करत नाही. पण संपवते मीच. भगवान श्रीकृष्णाने सांगितले की, जेव्हा कुणी तुमच्यासोबत भांडण करायला तयार असेल तर त्याला नकार देऊ नये'.
You may not start fights, but you’re not exactly Mother Teresa now are you... https://t.co/CQE0fbL9lP
— Shaniera Akram (@iamShaniera) September 21, 2020
कंगनाचं हे ट्विट रिट्विट करत पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरमची पत्नी शनिएरा अकरमने लिहिले की, 'होऊ शकतं तू भांडणाला सुरूवात केली नसेल, पण तू मदर तेरेसा तर अजिबातच नाहीये...आहेस का?'. ही पहिलीच वेळ नाही की, पाकिस्तानातून कंगनाला विरोध झाला. याआधी मुनीब बट्ट आणि गायिका मोमिना मुस्तेहसनने सुद्धा कंगनाच्या वादग्रस्त ट्विटवर उत्तर दिलं होतं.
दरम्यान, कंगना रणौतने मुंबईच तुलना पाकिस्तानसोबत केली होती तेव्हाही ती ट्रोल झाली होती. एक पाकिस्तानी पत्रकार म्हणाला होता की, तुझी लढाई तुझ्या देशापर्यंत ठेव. आमच्या इथे निरपराध झालेल्या लोकांची घरे पाडली जात नाहीत. त मुंबईतील लोकांनीही कंगनावर टिका केली होती.
हे पण वाचा :
कंगना रणौतवर भडकल्या रेणुका शहाणे, म्हणाल्या - सुशांत मृत्यू केसचा मुद्दाच भरकटवला....
ड्रग्ज प्रकरणात दीपिका पादुकोणचे नाव येताच कंगनाने साधला निशाणा; म्हणाली, रिपीट आफ्टर मी...!
सोनू सूदने पहिल्यांदाच सांगितलं कंगना रणौतचा 'मणिकर्णिका' सोडण्याचं कारण, म्हणाला -