Kangana Ranaut : "बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 11:28 IST2026-03-18T11:27:26+5:302026-03-18T11:28:38+5:30
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने 'सरके चुनर' या गाण्यावर टीका केली आहे.

Kangana Ranaut : "बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय"; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप
सध्या इंटरनेटवर एका गाण्याने मोठा वाद निर्माण केला आहे. कन्नड चित्रपट 'केडी: द डेविल' मधील 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्यातील अश्लीलतेमुळे हे गाणं मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे. वाढता विरोध पाहून या गाण्याचं हिंदी व्हर्जन सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आलं असून लवकरच त्याचं नवीन व्हर्जन रिलीज केलं जाणार आहे. मात्र या गाण्यावरून सुरू झालेला वाद अद्याप थांबलेला नाही. अभिनेत्री आणि भाजपा खासदार कंगना राणौतने या गाण्यावर टीका केली आहे.
संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने आपला संताप व्यक्त केला. ती म्हणाली, "अश्लीलता आणि चीप पीआर स्टंट्सच्या माध्यमातून लक्ष वेधून घेण्यासाठी बॉलिवूडने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. संपूर्ण देश त्यांचा धिक्कार करत आहे, त्यांना फटकारत आहे. पण मला वाटत नाही की त्यांना काही लाज उरली आहे. अशा प्रकारची गाणी आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत, ही काही नवीन गोष्ट नाही."
#WATCH | दिल्ली: भाजपा सांसद कंगना रनौत ने एक्ट्रेस नोरा फतेही के गाने पर हुए विवाद पर कहा, "अश्लीलता, चीप PR टैक्टिक्स के लिए बॉलीवुड ने हर हद पार कर दी है। सारा देश उन्हें धिक्कार रहा है, उन्हें फटकार रहा है लेकिन मुझे नहीं लगता कि उन्हें कोई शर्म होगी। इस तरह के गाने हम बचपन… pic.twitter.com/qkf6v6aARp
— ANI_HindiNews (@AHindinews) March 17, 2026
"मधल्या काळात त्यांच्यावर निर्बंध आले होते आणि आता मला वाटतं की त्यांच्यावर अधिक कडक कारवाई होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या अश्लीलतेच्या प्रदर्शनामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांवर वाईट परिणाम होतो. कुटुंबासोबत बसून टीव्ही पाहणं कठीण झालं आहे. मला वाटतं आता बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आली आहे."
गीतकाराने मागितली माफी
'सरके चुनर तेरी' या गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनाही युजर्सनी जबरदस्त ट्रोल केलं आहे. या टीकेनंतर रकीब यांनी मंगळवारी आपली प्रतिक्रिया दिली आणि या गाण्याशी जोडले गेल्याबद्दल माफीही मागितली. 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना आलम यांनी स्पष्ट केलं की, हे शब्द त्यांनी स्वतः लिहिलेले नसून चित्रपटाचे दिग्दर्शक प्रेम यांनी लिहिले आहेत.
ते म्हणाले, "मी हे बोल लिहिलेले नाहीत. दिग्दर्शक प्रेम यांनी ते कन्नड भाषेत लिहिले होते. जेव्हा मला हे गाणं लिहिण्यास सांगितलं गेलं, तेव्हा मी नकार दिला होता. मी त्यांना सांगितलं होतं की अशी गाणी चालणार नाहीत आणि सेन्सॉर होतील. पण त्यांनी मला फक्त कन्नड व्हर्जनचं ट्रान्सलेशन करून देण्यास सांगितलं. 'चूसेगा', 'चाटेगा' यांसारखे शब्द मूळ गाण्यातच होते."