पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:03 AM2021-11-11T11:03:19+5:302021-11-11T11:03:42+5:30

होय, पद्म पुरस्कार वितरण सोहळा सुरू होता आणि या सोहळ्यात Kangana Ranautची नजर एका व्यक्तिला शोधत भिरभिरतं होती. ही व्यक्ती कोण तर करण जोहर.

Kangana Ranaut Reveals She Was Searching For Karan Johar During Padma Awards Ceremony Due To This Reason | पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

पद्मश्री सोहळ्यादरम्यान करण जोहरला शोधत होती कंगना राणौत, नेमकी भानगड काय?

googlenewsNext

बॉलिवूडची ‘पंगा गर्ल’ कंगना राणौतला (Kangana Ranaut) नुकतंच पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. तिच्यासोबत निर्माती एकता कपूर आणि दिग्दर्शक-निर्माता करण जोहर ( Karan Johar ) यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पद्म पुरस्कार वितरण सोहळा  (Padma shri Award) सुरू होता आणि या सोहळ्यात कंगनाची नजर  एका व्यक्तिला शोधत भिरभिरतं होती. ही व्यक्ती कोण तर करण जोहर. होय, अख्ख्या सोहळ्यात कंगना करण जोहरला शोधत होती. अर्थात हा खुलासा आमचा नाही खुद्द कंगनाचा आहे.

टाइम्स नाऊ समिटमध्ये कंगनाने ही माहिती दिली. ‘मी करण जोहरला शोधत होते. मी खूप शोधलं पण तो भेटला नाही. भेटला असता तर कदाचित मी त्याला भेटले असते. आमची सेरेमनी वेगवेगळ्या वेळी होती. कदाचित आम्हा दोघांना वेगवेगळं ठेवण्याच्या उद्देशाने आम्हाला वेगवेगळ्या वेळी बोलवलं गेलं असावं. मी करणला शोधलं पण तो तिथे नव्हता,’असं कंगना म्हणाली.

भेटला असता तर त्याच्याशी बोलली असती का? असं विचारलं असता, हो, निश्चितपणे मी बोलले असते. दोन लोकांमध्ये मतभेद असू शकतात, वाद असू शकतात पण याचा अर्थ सहअस्तित्वावर विश्वास ठेवू नये, असा नाही. सहअस्तित्वावर माझा विश्वास आहे, असं ती म्हणाली.
करण व कंगना यांच्यातील वाद तुम्हाला ठाऊक आहेच. 2017 साली करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये कंगना करणला नको ते बोलली होती. अगदी तिनं त्याला मुव्ही माफियाही म्हणत डिवचलं होतं.

कंगनाने नुकताच 2007 च्या फिल्मफेअर अवार्ड सोहळ्याचा एक व्हिडिओ शेअर केला  होता. करण जोहर अवॉर्ड शो होस्ट करत होता आणि एका अवॉर्डसाठी कंगनाला बोलवतो. अवॉर्ड घेतल्यावर कंगना स्टेजवरून जात असते आणि त्यावेळी करण कंगनाचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. ज्याकडे ती दुर्लक्ष करत पुढे निघून जाते. हा व्हिडीओ शेअर करत कंगनाने करणची फिरकी घेतली होती. ‘हाहाहा, माझा एटीट्यूड आधीपासूनच खराब आहे. इंडस्ट्रीत हे माझं पहिलंच वर्ष होतं. मी एक टीनएजरसारखी होते. पण एटीट्यूड असाच होता,’ असं तिनं व्हिडीओ शेअर करताना लिहिलं होतं.
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर कंगना लवकरच  धाकड, तेजस आणि इमरजन्सी  सारख्या सिनेमात दिसणार आहे. सोबतच किंगना टीकू वेड्स शेरू सिनेमाची निर्मितीही करत आहे.
 

Web Title: Kangana Ranaut Reveals She Was Searching For Karan Johar During Padma Awards Ceremony Due To This Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.