कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2021 09:32 PM2021-02-12T21:32:48+5:302021-02-12T21:33:03+5:30

काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यातील सारणी येथे शूटिंग स्थळ असलेल्या कोल हॅन्डलिंग प्लांटच्या गेटवर कंगनाविरोधात जबरदस्त आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि वाटर कॅननचा वापरही करावा लागला.

Kangana Ranaut hit back at congress and says I am not interested in politics know more | कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य

कंगनाचा काँग्रेसवर पलटवार, राजकारणात येण्यासंदर्भात केलं असं भाष्य

googlenewsNext

बैतूल - काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिलेल्या धमकीवर अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पलटवार केला आहे. तिने धमकीची कुठल्याही प्रकारची परवा न करता, एक प्रकारे दोन-दोन हात करण्याचा इशाराच दिला आहे. एक ट्विट करत कंगनाने हा इशारा दिला आहे. कंगनाने ट्विट करत म्हटले आहे, "नेतागिरी करण्यात मला रस नाही. पण असे वाटते, की काँग्रेस (congress) मला नेता बनवूनच राहील. (Kangana Ranaut hit back at congress and says I am not interested in politics know more)

मोदीजी, पृथ्वीराज चौहान यांनी केलेली चूक तुम्ही करू नका...! कंगना राणौतची टिवटिव थांबेना

दुसरीकडे, काँग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मध्य प्रदेशामधील बैतूल जिल्ह्यातील सारणी येथे शूटिंग स्थळ असलेल्या कोल हॅन्डलिंग प्लांटच्या गेटवर कंगनाविरोधात जबरदस्त आंदोलन केलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज आणि वाटर कॅननचा वापरही करावा लागला.

प्रशांत भूषण यांनी कंगना रनौतच्या क्षमतेवर उपस्थित केला सवाल; अ‍ॅक्‍ट्रेसनेही त्याच स्‍टाइलमध्ये केला 'धाकड' पलटवार

काँग्रेसने दिली धमकी - 
काँग्रेसने कंगनाला धमकी दिली आहे, की चोवीस तासांच्या आत शेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यांवर कंगनाने माफी मागितली नाही, तर उग्र आंदोलन करण्यात येईल. यानंतर मध्य प्रदेशचे गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी कंगनाचा बचाव करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेली धमकी गंभीर असल्याचे म्हटले आहे. 

सारणी येथे सुरू आहे शूटिंग -
याशिवाय नरोत्तम मिश्रा यांनी, कंगनाला कुणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, असे ट्विट देखील त्यांनी केले आहे. कंगना सध्या सारणी येथील सतपुडा ताप विद्युत गृहाच्या कोल हॅन्डलिंग प्लांटमध्ये 'धाकड' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. 

Web Title: Kangana Ranaut hit back at congress and says I am not interested in politics know more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.