Kangana Ranaut : "माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी ट्रॉमा, ते लोक फक्त..."; कंगना राणौतचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 10:25 IST2024-08-19T10:12:00+5:302024-08-19T10:25:19+5:30
Kangana Ranaut : कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे.

Kangana Ranaut : "माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी ट्रॉमा, ते लोक फक्त..."; कंगना राणौतचा मोठा खुलासा
कंगना राणौत 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने सांगितलं की तिला बॉलिवूड पार्ट्या अजिबात आवडत नाहीत. या पार्ट्यांमध्ये नेमकं काय होतं हे प्रत्येक व्यक्तीला माहीत असणं महत्त्वाचं असल्याचंही तिला वाटतं. कंगनाने ट्रेलर लॉन्चवेळी सांगितलं की, मला जास्त गर्दी आवडत नाही. कंगनाने बॉलिवूड स्टार्सना 'पागल' आणि 'डम्ब' म्हटलं आहे. पार्ट्यांमध्ये ज्या प्रकारची चर्चा होती ती फारशी चांगली नसते असंही म्हटलं आहे.
Raj Shamani सोबतच्या संवाद साधनाता कंगना म्हणाली, "बॉलिवूड आवडणारी मी महिला नाही. मला बॉलिवूडच्या लोकांची मैत्रीण व्हायचं नाही. ही गोष्ट माझ्यात नाही. बॉलिवूडचे लोक फक्त स्वतःचा विचार करतात. ते लोक पागल, डम्ब आहेत. ते फक्त प्रोटीन पितात आणि तसाच त्याचा मेंदूही झाला आहे."
जेव्हा होस्ट म्हणाला की, बॉलिवूडमधील सर्वच लोक असे नसतात, तर काही स्टार्स खूप चांगलं काम करत आहेत. यावर कंगना म्हणाली, "मी खूप बॉलिवूड पाहिलं आहे, त्यामुळे कोण काय करतं ते तुम्ही मला सांगू नका. जर बॉलिवूडचे लोक शूटिंग करत नसतील तर मी तुम्हाला सांगते त्यांचा दिवस कसा आहे. ते सकाळी उठतात, फिजिकल ट्रेनिंग करतात आणि दुपारी झोपतात."
"उठल्यानंतर ते पुन्हा जिममध्ये जातात आणि नंतर झोपतात किंवा टीव्ही पाहतात. ते काय करत आहेत हे त्यांनाही कळत नाही. अशा लोकांशी तुम्ही मैत्री कशी करू शकता? कुठे काय चाललंय ते त्यांना कळत नाही, ते कोणाशी बोलत नाहीत, भेटत नाहीत, ड्रिंक्स घेतात. जर बॉलिवूडमध्ये एखादी चांगली व्यक्ती भेटली तर मला धक्का बसेल, बॉलिवूडमधील लोक फक्त कार आणि पैशाबद्दल बोलतात. माझ्यासाठी बॉलिवूड पार्टी ट्रॉमा आहे." कंगना राणौतचा 'इमर्जन्सी' चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री इंदिरा गांधींची भूमिका साकारत आहे.