किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले हेच विसरली कंगना, आमिरला म्हणाली 'बिचारा'; कंगनाचे ट्विट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:35 IST2023-02-11T12:34:50+5:302023-02-11T12:35:34+5:30

कंगनाने ट्विटरवर परत आल्यानंतर बॉलिवूडवर निशाणा साधण्यासपुन्हा सुरुवात केली आहे.

kangana ranaut calls amir khan bechara forgot how many national awards she won | किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले हेच विसरली कंगना, आमिरला म्हणाली 'बिचारा'; कंगनाचे ट्विट चर्चेत

किती राष्ट्रीय पुरस्कार मिळाले हेच विसरली कंगना, आमिरला म्हणाली 'बिचारा'; कंगनाचे ट्विट चर्चेत

Kangana Ranaut : अभिनेता आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्यानंतर आमिरने ब्रेक घेतला. यानंतर आमिर सार्वजनिक ठिकाणीही फारसा दिसला नाही. नुकतेच बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने आमिरवर निशाणा साधत त्याला बेचारा असे संबोधले आहे. लेखिका शोभा डे यांच्या कार्यक्रमात आमिरने कंगनाची खरं तर स्तुती केली. तोच व्हिडिओ शेअर करत कंगनाने आमिरला बेचारा म्हटले.

शोभा डे यांच्या एका बुक लॉंच इव्हेंटमध्ये आमिरला प्रश्न विचारण्यात आला की, शोभा डे यांच्यावर एखादी बायोपिक बनली तर त्यांची भूमिका कोण करेल. यावर आमिरने दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट यांची नावं घेतली. यावर शोभा डे यांनी स्वत:च कंगनाची आठवण करुन दिली. यानंतर मात्र दोघांनी कंगनाची खूप स्तुती केली. कंगनाचे नाव घेतल्यावर आमिर म्हणाला, 'हो कंगना खूप टॅलेंटेड अभिनेत्री आहे. ती सुद्धा चांगल्या पद्धतीने भूमिका करु शकेल. थलायवीमध्ये शोभा ने कंगनाची तारीफही केली होती.'

यावर कंगनाने मात्र असा विचार केला की आमिरने तिचे नाव न घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आमिरचा हा व्हिडिओ शेअर करत कंगनाने ट्विट केले, 'बिचारा आमिर...त्याने पूर्ण प्रयत्न केला पण त्याला हे माहित नाही की मी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती आहे. आणि त्याने नावं घेतलेल्यांपैकी एकाही अभिनेत्रीला एकदाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही.'

नंतर तिने पुन्हा ट्विट केले, 'माफ करा मला ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मला चाहत्यांनी आठवण करुन दिली. मला तर आठवतही नव्हते.'

कंगना ट्विटरवर परत आल्यानंतर बॉलिवूडवर निशाणा साधण्यास तिने पुन्हा सुरुवात केली आहे. कोणाला ना कोणाला ती लक्ष करत असते. मात्र नुकतेच तिने शाहरुखच्या पठाण सिनेमाची तारीफही केली आहे. कंगना लवकरच 'इमर्जन्सी' या सिनेमात दिसणार आहे. त्यात तिने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.

Web Title: kangana ranaut calls amir khan bechara forgot how many national awards she won