कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 13:38 IST2023-10-20T13:35:33+5:302023-10-20T13:38:56+5:30
कंगनाने भाच्याचं ठेवलेलं नाव नेटकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही

कंगना रणौत झाली आत्या, भाच्याचं नाव ऐकून आठवेल 'महाभारत'; नेटकऱ्यांची टीका
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. तिचा भाऊ अक्षत रणौतला मुलगा झाला आहे. यानिमित्त कंगनाने संपूर्ण कुटुंबासोबत आणि बाळासोबतचे छान क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये तिच्या आईच्या चेहऱ्यावर आजीचा झाल्याचा विशेष आनंद दिसतोय. तर कंगना आणि रंगोलीही आत्या झाल्याने त्यांचाही आनंद गगनात मावेना झालाय. दरम्यान कंगनाने आपल्या भाच्याचं ठेवलेलं नाव ऐकून सर्वच आश्चर्यचकित झालेत.
कंगनाने बाळासोबतचे फोटो शेअर करत लिहिले, 'आजच्या शुभदिनी आमच्या कुटुंबात चिमुकल्याचं आगमन झालं आहे. माझा भाऊ अक्षत रणौत आणि त्याची पत्नी रितू यांनी मुलाला जन्म दिला. या तेजस्वी आणि मनमोहक मुलाचं नाव आम्ही 'अश्वत्थामा रणौत' ठेवलं आहे. आमच्या कुटुंबातील या नवीन सदस्याला तुम्हीही आशिर्वाद द्या. आमचा आनंद आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आम्ही तुमचे आभारी आहोत.'
कंगनाच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांना बाळाचं नाव आवडलेलं नाही. महाभारतात अश्वत्थामाला श्रीकृष्णाने शाप दिला होता. आपण हे नाव ठेवत नाही अशी कमेंट एकाने केली आहे.
कंगना रणौतचा 'तेजस' सिनेमा प्रदर्शित होतोय. यामध्ये तिने पायलटची भूमिका साकारली आहे. याशिवाय तिचा 'इमर्जन्सी' हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे.