कंगनाने इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे केले कौतुक, म्हणाली - साधी राहणी उच्च विचारसरणी, हेच खरे भारतीयत्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:08 IST2023-08-27T20:01:43+5:302023-08-27T20:08:57+5:30
कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक केले.

kangana ranaut
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत इस्रोच्या महिला वैज्ञानिकांचे कौतुक केले.
कंगनाने इस्रोच्या महिला शास्त्रज्ञांचे फोटो शेअर केला आहे. तिने म्हटले की, " बिंदी, सिंदूर आणि मंगळसूत्रामध्ये भारतातील आघाडीचे शास्त्रज्ञ... साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणीचे प्रतीक... हेच खरे भारतीयत्व.
कंगनाच्या वर्कफ्रंट बोलायचे झाले तर ती आगामी 'चंद्रमुखी 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राघव लॉरेन्स देखील आहेत. रजनीकांत आणि ज्योतिका अभिनीत चंद्रमुखी या ब्लॉकबस्टर तमिळ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर 15 सप्टेंबर रोजी हॉरर-कॉमेडी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
याशिवाय कंगना 'इमर्जन्सी' या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. अभिनेत्री या चित्रपटात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. ज्यात अनुपम खेर, सतीश कौशिक आणि मिलिंद सोमण यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. कंगनाने मणिकर्णिका फिल्म्स या बॅनरखाली 'इमर्जन्सी'चे दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे.