शाहरुख खानमुळे सिनेमाचं नुकसान झालं? कमल हासन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- "मुंबईत चित्रपटाचं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 11:26 IST2026-02-22T11:25:32+5:302026-02-22T11:26:38+5:30
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक कमल हासन यांनी तब्बल २६ वर्षांनंतर आपल्या एका जुन्या चित्रपटाचं शाहरुख खानमुळे कसं नुकसान झालं, याचा मोठा खुलासा करुन खंत व्यक्त केली आहे

शाहरुख खानमुळे सिनेमाचं नुकसान झालं? कमल हासन यांचा मोठा खुलासा, म्हणाले- "मुंबईत चित्रपटाचं..."
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक कमल हासन यांनी तब्बल २६ वर्षांनंतर आपल्या 'हे राम' या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाबाबत मोठे विधान केले आहे. या चित्रपटाच्या अपयशामागे त्यांनी बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानची लोकप्रियता आणि चुकीचं 'पीआर मार्केटिंग' जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
कमल हासन यांचा २६ वर्षांनी खुलासा
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन यांनी 'हे राम'च्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, "मुंबईमध्ये चित्रपटाचं जे प्रमोशन करण्यात आलं, त्यामुळे प्रेक्षकांना असा समज झाला की चित्रपटात शाहरुख खानची भूमिका खूप मोठी आहे. ही एक मोठी पीआर चूक होती. प्रत्यक्षात चित्रपटात शाहरुखची भूमिका महत्त्वाची असली तरी ती लहान होती. प्रेक्षक त्याला अधिक वेळ पाहण्यासाठी उत्सुक होते आणि जेव्हा तसे झाले नाही, तेव्हा त्यांची निराशा झाली. कदाचित याच कारणामुळे प्रेक्षक संतापले आणि चित्रपटाकडे पाठ फिरवली."
एकूणच शाहरुख खानचा उल्लेख केल्याने सिनेमाचं कसं नुकसान झालं, हे कमल हासन यांनी सांगितलं. हिंदी प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने बॉक्स ऑफिसवर 'हे राम' अपेक्षित कमाई करु शकला नाही.
मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना
२००० मध्ये प्रदर्शित झालेला 'हे राम' हा चित्रपट कमल हासन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि भावनिक प्रोजेक्ट होता. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मात्र, चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे कमल हासन यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
चित्रपटाचा विषय
'हे राम' हा चित्रपट फाळणीच्या काळातील भारताच्या इतिहासावर आधारित होता. यात महात्मा गांधींच्या हत्येपर्यंतचा प्रवास साकेत राम (कमल हासन) आणि त्याचा मित्र अमजद अली खान (शाहरुख खान) यांच्या नजरेतून मांडण्यात आला होता. आज हा चित्रपट 'कल्ट क्लासिक' म्हणून ओळखला जातो, परंतु त्याच्या प्रदर्शनाच्या वेळी झालेल्या मार्केटिंगच्या चुकीमुळे सिनेमाला मोठं अपयश सहन करावं लागलं, असं आता कमल हासन यांनी मान्य केलं आहे.