Vikram Twitter Review: कसा आहे कमल हासन यांचा ‘विक्रम’? वाचा, पब्लिकचा फर्स्ट डे, फर्स्ट शो रिव्ह्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:58 IST2022-06-03T12:56:26+5:302022-06-03T12:58:08+5:30

Vikram Twitter Review: हा चित्रपट कसा आहे तर ट्विटरवर फॅन्सचे रिव्ह्यू आले आहेत. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिलेल्या चाहत्यांनी या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

kamal haasan film vikram movie twitter review in hind twitter reaction | Vikram Twitter Review: कसा आहे कमल हासन यांचा ‘विक्रम’? वाचा, पब्लिकचा फर्स्ट डे, फर्स्ट शो रिव्ह्यू

Vikram Twitter Review: कसा आहे कमल हासन यांचा ‘विक्रम’? वाचा, पब्लिकचा फर्स्ट डे, फर्स्ट शो रिव्ह्यू

Vikram Twitter Review: कमल हासन  (Kamal Haasan) हे तब्बल चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. त्यांचा अ‍ॅक्शन थ्रीलर सिनेमा ‘विक्रम’ (Vikram )आज रिलीज झाला. लोकेश कनगराजने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात एक नाही तर तीन बडे साऊथ स्टार्स आहेत. कमल हासन आहेतच. शिवाय विजय सेतुपती आणि मल्याळम सिनेमाचा लोकप्रिय चेहरा फहाद फासिल असे दोन दिग्गज स्टार चित्रपटात आहेत. इतकंच नाही तर साऊथ सुपरस्टार सूर्या याचाही कॅमिओ आहे. अशात फॅन्स क्रेझी झाले नसतील तर नवल.

हा चित्रपट कसा आहे तर ट्विटरवर फॅन्सचे रिव्ह्यू आले आहेत. फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहिलेल्या चाहत्यांनी या चित्रपटावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना चित्रपट आवडला आहे तर काहींना हा चित्रपट सामान्य असल्याचं म्हटलं आहे. कमल हासन यांच्यापेक्षा चित्रपटातील सूर्याच्या एन्ट्रीनं चाहत्यांना खूश्श केलं आहेत. सूर्याचा रोल छोटा असलं तरी त्याला पाहून चाहत्यांनी त्याचं भरभरून कौतुक केलं आहे.

पाहुया तर, चाहत्यांनी काय दिल्या प्रतिक्रिया...

 ‘विक्रम’ या चित्रपटामध्ये कमल हासन मुख्य भूमिकेत आहेत. त्यांनीच हा सिनेमा प्रोड्यूस केला आहे. या चित्रपटासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलं आहे. चित्रपटात विजय सेतुपती हा सुद्धा मुख्य भूमिकेत आहे. त्याने या चित्रपटासाठी 10 कोटींचं मानधन घेतल्याचं कळतंय. ‘विक्रम’ चित्रपटाचं एकूण बजेट हे 150 कोटी आहे.  

Web Title: kamal haasan film vikram movie twitter review in hind twitter reaction