'कच्चा बदाम' गर्लने बॉयफ्रेंडला गिफ्ट केली महागडी घड्याळ, आकडा वाचून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 14:42 IST2024-02-21T14:39:48+5:302024-02-21T14:42:43+5:30

नुकतेच अंजली अरोराच्या बॉयफ्रेंडचा बर्थडेचं दणक्यात सेलिब्रेशन झालं.

'Kachcha Badam' girl gifted an expensive watch to her boyfriend, A Watch Worth THIS HUGE Amount | 'कच्चा बदाम' गर्लने बॉयफ्रेंडला गिफ्ट केली महागडी घड्याळ, आकडा वाचून बसेल धक्का!

'कच्चा बदाम' गर्लने बॉयफ्रेंडला गिफ्ट केली महागडी घड्याळ, आकडा वाचून बसेल धक्का!

इंटरनेट सेन्सेशन अंजली अरोरा सोशल मीडियावर आधीच प्रसिद्ध होती, पण 'लॉक अप'शोने अंजलीची लोकप्रियतेत वाढ झाली. इंस्टाग्रामवर तिची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. इन्स्टाग्रामवर 'कच्चा बदाम' या ट्रेंडिंग गाण्यावर रील बनवून अंजली अरोरा एकारात्रीत स्टार बनली. तिच्या अदांमुळे आणि सोशल मीडिया रील्समुळे अंजलीने स्वतःची ओळख मिळवली आहे. सध्या तिचं नाव खूप चर्चेत येत आहे. 

नुकतेच अंजली अरोराच्या बॉयफ्रेंडचा बर्थडेचं दणक्यात सेलिब्रेशन झालं. यावेेळी अंजलीने आपल्या बॉयफ्रेंडला महागडी घड्याळ गिफ्ट केली आहे. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ज्यामध्ये अंजली तिच्या बॉयफ्रेंडला घड्याळ देताना दिसून येत आहे. या घड्याळाची किंमत लाखामध्ये आहे. अंजलीने बॉयफ्रेंडला दिलेलं हे घड्याळ राडो ब्रँडचं आहे. याची किंमत २ लाख रुपये असल्याची माहिती आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

अंजली अरोरा हिने शॉर्ट-व्हिडिओ प्लॅटफॉर्म टिकटॉकने सोशल मीडियावर सुरुवात केली होती. भारतात टीकटॉक बंद झाल्यानंतर तिने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केले. अंजलीने अनेक म्युझिक व्हिडिओ आणि अल्बममध्येही काम केले आहे. कंगना रानौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये अंजली दिसून आली होती. यामध्ये तिचा परफॉर्मन्स सगळ्यांनाच आवडला होता. तसंच या शोचा विजेता मुन्नवर फारुकीसोबतची तिची मैत्री सुद्धा चर्चेत होती.

Web Title: 'Kachcha Badam' girl gifted an expensive watch to her boyfriend, A Watch Worth THIS HUGE Amount