रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:21 IST2025-01-16T13:20:07+5:302025-01-16T13:21:14+5:30
'धूम ४'मध्ये रणबीर कपूरसोबत हा अभिनेता मुख्य खलनायक म्हणून समोर येणार आहे. (Dhoom 4)

रणबीर कपूर नाही तर हा साउथ सुपरस्टार 'धूम ४' मध्ये साकारणार खलनायक?
सध्या 'धूम ४' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'धूम' ही भारतीय सिनेमातील एक गाजलेली फ्रँचायझी. त्यामुळे 'धूम ४' सिनेमा कसा असेल याची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून 'धूम ४'मध्ये रणबीर कपूर झळकणार असल्याचंही बोललं जातंय. पण आता 'धूम ४'विषयी मोठी अपडेट समोर आलीय ती म्हणजे 'धूम ४'मध्ये रणबीर नाही तर साउथ सुपरस्टार विलन म्हणून झळकणार आहे. कोण आहे तो?
'धूम ४'मध्ये हा साउथ सुपरस्टार मुख्य खलनायक?
मीडिया रिपोर्टनुसार 'धूम ४'मध्ये मुख्य खलनायक म्हणून ज्यु.एनटीआर झळकणार आहे. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की, रणबीर हा सिनेमातील मुख्य खलनायक आहे. पण तसं नाही. सिनेमात RRR फेम ज्यु. एनटीआर मुख्य खलनायक म्हणून समोर येणार आहे. अर्थात याविषयी अधिकृत घोषणा अजून झाली नाहीये. तरीही ही चर्चा ऐकून 'धूम ४'ची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांना नक्कीच आनंद झाला असेल यात शंका नाही.
'धूम ४'कधी होणार रिलीज
यश चोप्रा बॅनर अंतर्गत 'धूम' सिनेमात आतापर्यंत जॉन अब्राहम, हृतिक रोशन आणि आमिर खान यांनी खलनायकी भूमिका साकारल्या. अभिषेक बच्चन, उदय चोप्रा यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका साकारली. आता 'धूम ४'मध्ये अभिषेक आणि उदय यांचीही कास्टिंग बदलणार असल्याचं समजतंय. 'धूम ४'चं सध्या प्री-प्रॉडक्शनचं काम सुरु असून हा सिनेमा पुढील वर्षी अर्थात २०२६ ला रिलीज होण्याची शक्यता आहे.