हृतिकच्या डान्स स्टेप्सवर भारी पडतोय ज्युनिअर एनटीआर, 'जनाब ए अली' गाण्याची झलक समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:10 IST2025-08-07T17:10:01+5:302025-08-07T17:10:23+5:30
'ज्युनिअर एनटीआर हृतिकला कडक फाईट देत आहे', चाहते अवाक

हृतिकच्या डान्स स्टेप्सवर भारी पडतोय ज्युनिअर एनटीआर, 'जनाब ए अली' गाण्याची झलक समोर
हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) यांच्या आगामी 'वॉर २'ची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. यशराज फिल्म्सच्या या सिनेमात दोघांचेही जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. ट्रेलरमध्येच याची झलक दिसली आहे. तसंच हृतिक आणि कियारा अडवाणीची हॉट केमिस्ट्रीही चर्चेत आहे. दरम्यान सिनेमातलं दुसरं गाणं 'जनाब ए अली' रिलीज होणार आहे. गाण्याची झलक नुकतीच समोर आली असून हृतिकसमोर ज्यु. एनटीआरच्या डान्स स्टेप्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.
हृतिक रोशन आणि डान्स हे समीकरणच आहे. त्याच्या या टॅलेंटला तोडच नाहीये. किती कठीण डान्स स्टेप्स असो हृतिक रोशनअगदी सहजरित्या करुन दाखवतो. त्याच्या सिनेमातील अनेक डान्स स्टेप्स आजही व्हायरल होतात. आता 'वॉर २'मधलं 'जनाब ए अली' गाण्याची झलक पाहा. यातही हृतिक त्याच्या चार्मिंग डान्स स्टेप्सने लक्ष वेधून घेत आहे. मात्र सिनेमात त्याला ज्यु. एनटीआरची टक्कर आहे. फक्त अॅक्शनच नाी तर ज्यु.एनटीआरने हृतिकचं डान्सिंग टॅलेंटही मॅच केलं आहे. हृतिकच्या स्टेप्स आणि सोबत ज्यु. एनटीआरची एनर्जी पाहून चाहते चकितच झालेत.
'तोही डान्स आणि तूही डान्सर, हा वॉर आहे','हृतिकच्या स्टेप्स + ज्यु. एनटीआरची एनर्जी = डेडली कॉम्बो', 'हेच थिएटरमध्ये पाहायला काय मजा येईल', 'हृतिक क्लासी आणि एनटीआर मास स्टेप्स', 'ज्युनिअर एनटीआर हृतिकला कडक फाईट देत आहे' अशा एकापेक्षा एक प्रतिक्रिया व्हिडिओवर आल्या आहेत.
‘जनाब ए आली’ हे गाणं पूर्णपणे ऑनलाईन रिलीज न करता केवळ चित्रपटगृहातच दाखवले जाईल, जेणेकरून प्रेक्षकांना हृतिक आणि एनटीआर यांना एकत्र डान्स करताना पाहण्याचा जिवंत अनुभव मिळेल.
‘वॉर 2’ १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.‘वॉर 2’ चे दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.