'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 10:09 IST2024-04-18T10:04:14+5:302024-04-18T10:09:49+5:30

जॉनी यांचं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप छान नातं आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.

Johnny Liver also danced with children on the song Gulabi Sari video going viral | 'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

'गुलाबी साडी' गाण्यावर जॉनी लिव्हरनेही मुलांसोबत केला डान्स, हटके स्टेप्स पाहून पोट धरुन हसाल!

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं खूपच गाजतंय. आतापर्यंत या गाण्यावर लाखो रील्स बनले आहेत. गुलाबी साडी नेसून या गाण्यावर तरुणी, बायका आपला नखरेल अंदाज दाखवत आहे. तर मुलंही या गाण्यावर ठेका धरत आहेत. कॉमेडीचे बादशाह ज्यांना म्हणलं जातं ते जॉनी लिव्हर (Johnny Lever) सुद्धा या गाण्याचे  फॅन झाल्याचं दिसतंय. जॉनी लिव्हर यांनीही 'गुलाबी साडी'वर मुलांसोबत डान्स केलाय.

जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी (Jamie Lever) ही सुद्धा कॉमेडी करते. तसंच ती कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्रीही आहे. वडिलांप्रमाणेच जेमीही खूप विनोदी आहे. तर त्यांचा मुलगा जेसी लिव्हरही कॉमेडीयन आहे. जॉनी यांचं त्यांच्या दोन्ही मुलांसोबत खूप छान नातं आहे. त्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. 'गुलाबी साडी' गाण्यावरही या तिघांचा हटके डान्स बघून प्रेक्षक खळखळून हसले आहेत. बाप आणि मुलांच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर नेटकऱ्यांना पोट धरुन हसवलं आहे.

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही मजेशीर कमेंट केल्या आहेत. जॉनी लिव्हरचे यांचे हावभाव म्हणजे ऑल टाईम हिट असतात. त्यांच्या याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी सिनेमांमध्ये नाव कमावलं. तर त्यांची लेक जेमी लिव्हर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अनेकदा ती बॉलिवूड स्टार्सची नक्कल करताना दिसते. सोनम कपूर, अनन्या पांडेचा तिने अनेकदा अभिनय केला आहे. वडील जॉनी लिव्हरसारखंच तिच्यातही टॅलेंट भरलेलं आहे. आपल्या विनोदी शैलीने ती चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. 

Web Title: Johnny Liver also danced with children on the song Gulabi Sari video going viral