जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 16:26 IST2020-12-07T16:22:27+5:302020-12-07T16:26:03+5:30

जॉन सीनाने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने मास्क लावला आहे. ज्यावर रणवीरचं फेमस गाणं 'अपना टाइम आएगा'चे बोल लिहिले आहेत. 

John Cena shared a captionless picture of Ranveer Singh and Arjun Kapoor reacted to it | जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

जॉन सीनाने रणवीर सिंहचा फोटो केला शेअर, अर्जुन कपूरच्या कमेंटने वेधलं सर्वांचं लक्ष

रणवीर सिंहसाठी WWF चॅम्पियन जॉन सीनाचं प्रेम पुन्हा एकदा सोशल मीडियावर बघायला मिळालं. जॉन सीनाने त्याच्या इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहचा एक फोटो शेअर केलाय. यात तो त्याच्या फॅनसोबत फोटो काढताना दिसतोय. तर या फोटोवर अभिनेता अर्जुन कपूरने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

जॉन सीनाने जो फोटो शेअर केलाय त्यात त्याच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीने मास्क लावला आहे. ज्यावर रणवीरचं फेमस गाणं 'अपना टाइम आएगा'चे बोल लिहिले आहेत. 

या फोटोवर सर्वात पहिली कमेंट अर्जुन कपूरने केली आणि त्याने लिहिले की,  बाबा बाबा बाबा. अर्जुन कपूरच्या या कमेंटला अभिनेता रणवीर सिंहने उत्तरही दिलं आहे. त्याने लिहिले की, 'काहीही'. हे पहिल्यांदाच नाही की, जॉन सीनाने रणवीर सिंहवरील प्रेम सोशल मीडियात व्यक्त केलं.  याआधीही त्याचे अनेक फोटो जॉन सीनाने शेअर केले आहेत आणि त्यावर कमेंट्सही आल्या आहेत.

याआधी जॉन सीनाने रणवीर सिंहचा एक खतरनाक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनला जॉन सीनाने लिहिले होते की, 'स्टोन कोल्ड सिंह'. जॉन सीनाने या फोटोत रणवीर सिंह आणि रेसलर स्टोन कोल्डचा लूक मिक्स केला होता. 

दरम्यान काही दिवसांपूर्वी रणवीरचा एक लूक चर्चेचा विषय ठरत होता. यात त्याने गळ्यात मोत्यांची माळ घातली होती. यावर अनेक फॅन्स आणि अभिनेता अर्जुन कपूरने कमेंट केली होती. अनेकांनी त्याला ही माळ दीपिकाची आाहे का विचारले होते. तर अर्जुन कपूर म्हणाला होता की, बाबा तू हिरा नाही मोती आहे.
 

Web Title: John Cena shared a captionless picture of Ranveer Singh and Arjun Kapoor reacted to it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.