बाबो! जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर दाखवलं बाइकचं झक्कास कलेक्शन, बघून म्हणाला - हे तर शोरूम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 16:40 IST2020-11-20T16:16:20+5:302020-11-20T16:40:11+5:30
जॉन अब्राहमने आपल्या चमकदार-दमदार बाइकचं कलेक्शन पहिल्यांदाच लोकांना दाखवलं आहे. काही क्षणांसाठी हे पार्किंग किंवा शोरूमही वाटू शकतं.

बाबो! जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर दाखवलं बाइकचं झक्कास कलेक्शन, बघून म्हणाला - हे तर शोरूम!
अभिनेता जॉन अब्राहमची बाइकसाठीची क्रेझ सर्वांनाच माहीत आहे. त्याच्याकडे बाइकचं असं कलेक्शन आहे की, कुणालाही इर्ष्या होईल. अनेकदा तो मुंबईतील रस्त्यांवर बाइकने फिरतानाही दिसत असतो. आता तर त्याने त्याच्या बाइकच्या कलेक्शनची झलक फॅन्सना दाखवली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने फोटो शेअर केला असून या फोटोंना ५ लाखांपेक्षा जास्त लाइक्स आणि भरभरून कमेंट्स मिळत आहेत.
जॉन अब्राहमने आपल्या चमकदार-दमदार बाइकचं कलेक्शन पहिल्यांदाच लोकांना दाखवलं आहे. काही क्षणांसाठी हे पार्किंग किंवा शोरूमही वाटू शकतं. पण हे जॉनचं पर्सनल बाइक कलेक्शन आहे. जॉनने या फोटो 'मेरी कॅंडी शॉप' असं कॅप्शन दिलं आहे. अनेक फॅन्स जॉनचं हे बाइक कलेक्शन पाहून अवाक् झाले आहेत.
दरम्यान, जॉन मिलाप जवेरीच्या पुढील सिनेमात बिझी आहे. तो 'सत्यमेव जयते २'मध्ये पुन्हा धमाका करताना दिसणार आहे. यात तो दिव्या खोसलासोबत रोमान्स करताना दिसेल. त्यासोबत जॉन 'अटॅक' सिनेमातही दिसणार आहे. यात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस असेल. तसेच जॉनकडे मोहित सुरीचा 'एक व्हिलन २' हाही सिनेमा आहे. यात त्याच्यासोबत दिशसा पटनी, अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया दिसतील.
चर्चा तर अशीही आहे की, जॉन अब्राहम शाहरूख खानच्या आगामी सिनेमात व्हिलनच्या भूमिकेत दिसेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार या सिनेमाचं टायटल 'पठाण' आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करेल. अशीही माहिती आहे की, या सिनेमाचं काम सुरू झालं आहे आणि यात मुख्य भूमिकेत दीपिका पादुकोण सुद्धा आहे.