Jersey Trailer : क्रिकेटच्या मैदानात उतरला शाहिद कपूर, २ वर्षांनंतर समोर आला 'जर्सी'चा धमाकेदार ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 18:49 IST2021-11-23T18:46:21+5:302021-11-23T18:49:23+5:30
Jersey Trailer : 'जर्सी' या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद पहिल्यांदाच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानलं जातं.

Jersey Trailer : क्रिकेटच्या मैदानात उतरला शाहिद कपूर, २ वर्षांनंतर समोर आला 'जर्सी'चा धमाकेदार ट्रेलर
कबीर सिंह' सिनेमाच्या भरघोस यशानंतर फॅन्स शाहिद कपूरच्या (Shahid Kapoor) आगामी सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर दोन वर्षांनंतर फॅन्सची प्रतिक्षा संपली आहे. शाहिदच्या आगामी 'जर्सी' सिनेमाच ट्रेलर (Jersey Trailer) रिलीज करण्यात आला आहे. शाहिद या सिनेमात एका क्रिकेट प्लेअरची भूमिका साकारत आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून शाहिद पहिल्यांदाच एका क्रिकेटरची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या देशात क्रिकेटला धर्म आणि क्रिकेटरला देव मानलं जातं. अशात शाहिदचा हा सिनेमा त्याच्या फॅन्ससोबत क्रिकेट प्रेमींसाठीही ट्रिट ठरेल असं दिसतंय.
क्रिकेटचं वेड असलेल्या एका तरूणाची ही कथा आहे. तो सध्या वेगळ्याच पेचात सापडला आहे. पण त्यातून तो कसा मार्ग काढतो हे बघणं महत्वाचं ठरेल. या सिनेमात शाहिदसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री मृणाल ठाकूर दिसणार आहे. तेच शाहिद कपूरचे वडील पंकज कपूर हे त्यांच्या मुलासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहेत. ते यात शाहिदच्या कोचची भूमिका साकारणार आहे.
हा सिनेमा साऊथच्या 'जर्सी' सिनेमाचाच रिमेक आहे. सिनेमाचं दिग्दर्शन गौतम तिन्ननुरीने केलं आहे. गौतमला याआधी तेलुगु व्हर्जनसाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. कबीर सिंहचा म्युझिक डायरेक्टर सचेत आणि परम्परा यांनीच या सिनेमालाही म्युझिक दिलं आहे. कबीर सिंह प्रमाणेच या सिनेमाची गाणीही चार्टबीटवर धमाका करतील अशी अपेक्षा आहे.