Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:26 IST2025-04-07T10:26:09+5:302025-04-07T10:26:26+5:30

जया बच्चन यांचा नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्यांची कृती पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे (jaya bachchan)

jaya bachchan new video that actress scold A woman put her hand on her shoulder | Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

Video: महिलेने खांद्यावर हात ठेवला, दचकून जया बच्चन यांनी मागे वळून पाहिलं अन् खूप झापलं

जया बच्चन (jaya bachchan) या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. सध्या जया बच्चन हिंदी सिनेसृष्टीत काम कमी करत असल्या तरीही त्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात. ते म्हणजे त्यांच्या रागीट स्वभावामुळे. जया बच्चन यांचा नवीन व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात त्या त्यांच्या एका चाहतीवर चांगल्याच रागावलेल्या दिसल्या. इतकंच नव्हे तिचा हात झटकताना आणि तिला सुनावतानाही दिसल्या. काय घडलं?

जया बच्चन पुन्हा संतापल्या

जया बच्चन यांचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसतं की, एक महिला जया बच्चन यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी त्यांच्या पाठीवर हात ठेवते. त्यामुळे जया बच्चन दचकतात. त्यानंतर अभिनेत्री त्या महिलेकडे बघतात आणि तिचा हात झटकतात. त्यानंतर त्या महिलेचा पती त्यांचा फोटो काढण्याचा प्रयत्न करतो. हे पाहताच जया बच्चन यांचा आणखी संतापतात. त्या सर्वांसमोर महिला आणि तिच्या पतीला सुनावतात. ते दोघंही अभिनेत्रीला "सॉरी सॉरी" म्हणताना दिसतात. परंतु जया बच्चन यांचा राग काही शांत होताना दिसत नाही. पुढे जया निघून जातात.


व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

जया बच्चन यांचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्रीवर चांगला संताप व्यक्त केलाय. "जया बच्चन यांना किती गर्व आहे", "जया बच्चन यांचा स्वभाव उद्धट आहे", "खरंच जयाजींनी त्या महिलेला धक्का देऊन दूर केलं, यावर विश्वास बसत नाहीये", अशा कमेंट करत नेटकऱ्यांनी जया बच्चन यांच्या कृतीवर टीका केलीये. जया बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्यांनी २०२३ साली आलेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात काम केलं होतं. सध्या त्या लोकसभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करताना दिसतात
 

Web Title: jaya bachchan new video that actress scold A woman put her hand on her shoulder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.