रेखा आणि अमिताभ यांचा रोमान्स पाहून ढसढसा रडल्या होत्या जया बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 12:51 IST2023-10-10T12:51:00+5:302023-10-10T12:51:55+5:30
जेवढे लोकांना वेड रेखा यांचे होते, तेवढीच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीचीही चर्चा होती.

Jaya Bachchan cried After Seeing Amitabh Love Scene With Rekha
इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों हैं...मनमोहक सुंदरतेचं जीवंत उदाहरण म्हणजे अभिनेत्री रेखा. उतारवयात देखील रेखा यांचं तेवढचं आकर्षक व मोहिनी घालणारं सौंदर्य अबाधित आहे. आजही त्यांच्या चाहत्यांची क्रेझ कायम आहे. रेखा १० ऑक्टोबर रोजी त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. रेखा यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिलेत. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक चित्रपट निर्मात्याची पहिली पसंती रेखा होत्या. जेवढे लोकांना वेड रेखा यांचे होते, तेवढीच रेखा आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीचीही चर्चा होती.
सारं जग त्यांच्यावर फिदा असताना रेखा या बिग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात होत्या. मात्र अमिताभ त्यांच्या वैवाहिक आयुष्यामध्ये गुंतलेले आहेत, याचा त्यांना विसर पडला होता. काही वर्षांपूर्वी साऱ्यांच्याच भूवया उंचावतील असाच एक किस्सा घडला होता. 'मुक्कदर का सिकंदर' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी संपूर्ण बच्चन कुटुंब पोहचले होते. जया पुढच्या रांगेत आणि अमिताभ आणि त्यांचे आई-वडील मागच्या रांगेत बसले होते.
ज्यावेळी बिग बींसोबत रेखा यांचा रोमॉंटिक सीन आला, तेव्हा जया यांच्या डोळ्यातील अश्रू वाहत होते. त्यांनी स्वतःला खूप सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे अश्रू काही थांबले नाहीत. आणि त्या सगळ्यांसमोरच रडू लागल्या.असंं म्हटल जातं की यानंतर वैवाहीक आयुष्यात समस्या निर्माण होऊ नये म्हणून शेवटी अमिताभ यांनीच कठोर पाऊले उचलत रेखा यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले.
'दो अनजाने' या चित्रपटापासून अमिताभ बच्चन आणि रेखा एकत्र काम करू लागले होते. खून पसीना आणि सुहाग या चित्रपटांमध्येही अमिताभ आणि रेखाची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळाली. सिलसिला चित्रपटातील रेखा आणि अमिताभ यांची जोडी खूप आवडली होती. आजही जेव्हा रेखासमोर अमिताभ बच्चन यांचा उल्लेख केला जातो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील प्रेम सहजपणे दिसते. या दोघांच्या प्रेमकथेचे किस्से आजही सोशल मीडियावर चर्चेत असतात.