जान्हवी कपूरने वाढदिवशी घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, हजारो पायऱ्या चढत सर केला तिरुमला पर्वत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 12:37 IST2026-03-06T12:35:42+5:302026-03-06T12:37:19+5:30

आपल्या २९ व्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने आज तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले.

Janhvi Kapoor visited Lord Venkateswara on her birthday stepped thousands of stair to reach tirumala | जान्हवी कपूरने वाढदिवशी घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, हजारो पायऱ्या चढत सर केला तिरुमला पर्वत

जान्हवी कपूरने वाढदिवशी घेतलं व्यंकटेश्वराचं दर्शन, हजारो पायऱ्या चढत सर केला तिरुमला पर्वत

अभिनेत्री जान्हवी कपूर आज २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांची ती लेक आहे. जान्हवीने २०१८ मध्ये 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. हा चित्रपट गाजलेल्या मराठी 'सैराट' चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक होता. आपल्या पहिल्याच चित्रपटातील अभिनयासाठी तिला 'सर्वोत्कृष्ट पदार्पण' हा मानाचा पुरस्कार मिळाला होता. यानंतर तिने एकापेक्षा एक सिनेमे दिले.जान्हवी तिरुपती भक्त आहे. अनेकदा ती कधी कुटुंबासोबत तर कधी बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत तिरुपतीच्या दर्शनाला जाते. आज वाढदिवसानिमित्त ती तिरुमलला व्यंकटेश्वराच्या दर्शनाला पोहोचली आहे.

आपल्या २९ व्या वाढदिवसानिमित्त जान्हवी कपूरने आज तिरुमला येथे जाऊन भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे तिने अलीपिरी मार्गाने पायी चालत तिरुमला पर्वत सर केला. तिचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांकडून तिच्या या श्रद्धेचे कौतुक होत असून तिच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.


करिअरच्या सुरुवातीलाच जान्हवीला एका मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला होता. तिचा पहिला चित्रपट 'धडक' प्रदर्शित होण्यापूर्वीच, २४ फेब्रुवारी २०१८ रोजी तिची आई श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. आईच्या जाण्याने कोसळलेल्या दुःखातून सावरत जान्हवीने मोठ्या धैर्याने चित्रपटसृष्टीत आपली जागा निर्माण केली. 'धडक'नंतर तिने अनेक आव्हानात्मक आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

२०२० मध्ये 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' मधील तिच्या पायलटच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले, तर 'मिली' या थ्रिलर चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले. जान्हवीने आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपली ओळख निर्माण केली आहे. २०२४ मध्ये तिने ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा: पार्ट १' मध्ये काम केले आणि सध्या ती राम चरणसोबतच्या आगामी 'पेड्डी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Web Title : जाह्नवी कपूर ने जन्मदिन पर वेंकटेश्वर मंदिर में दर्शन किए, तिरुमाला पर चढ़ाई की

Web Summary : जाह्नवी कपूर ने तिरुमाला में वेंकटेश्वर मंदिर में दर्शन करके अपना 29वां जन्मदिन मनाया, पहाड़ियों पर पैदल चढ़ाई की। एक भक्त, वह अक्सर परिवार या अपने बॉयफ्रेंड के साथ जाती है। उनकी फिल्मों में 'धड़क', 'गुंजन सक्सेना' और आगामी दक्षिण भारतीय परियोजनाएं शामिल हैं।

Web Title : Janhvi Kapoor Visits Venkateswara Temple on Birthday, Climbs Tirumala

Web Summary : Janhvi Kapoor celebrated her 29th birthday by visiting the Venkateswara Temple in Tirumala, climbing the hills on foot. A devotee, she often visits with family or her boyfriend. Her films include 'Dhadak,' 'Gunjan Saxena,' and upcoming South Indian projects.