NTR30 च्या शूटिंगला सुरुवात, जान्हवी कपूरने शेअर केला फोटो; JrNTR सोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 18:44 IST2023-03-23T18:34:31+5:302023-03-23T18:44:01+5:30

जान्हवीने हिरव्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून आलं आहे.

Janhvi Kapoor JR NTR movie NTR 30 shoot starts actress shared photos on social media | NTR30 च्या शूटिंगला सुरुवात, जान्हवी कपूरने शेअर केला फोटो; JrNTR सोबत झळकणार

NTR30 च्या शूटिंगला सुरुवात, जान्हवी कपूरने शेअर केला फोटो; JrNTR सोबत झळकणार

अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) साऊथ सिनेमात पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरसोबत (JrNTR) ती 'एनटीआर 30' (NTR30) या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशीचे सेटवरील काही फोटो जान्हवीने सोशल मीडियावर अपलोड केले आहेत.

जान्हवीने हिरव्या रंगाच्या साडीत फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिचं सौंदर्य अगदी खुलून आलं आहे. तसेच कानात हिरव्या रंगाचे झुमके आहेत जे सौंदर्याची शोभा वाढवत आहेत. यासोबतच तिने मुहुर्त शॉटचा क्लॅपबोर्डचा फोटोही पोस्ट केला आहे.

काही दिवसांपूर्वीच जान्हवीने 'एनटीआर 30' सिनेमातील लुकचा फोटो पोस्ट केला होता. ज्युनिअर एनटीआरसोबत काम करण्याचं जान्हवीचं स्वप्नही आता पूर्ण होत आहे. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की ज्युनिअर एनटीआर तिचा आवडता हिरो आहे. त्याच्यासोबत काम करण्याची संधी ती कधीच मिस करणार नाही. तेव्हाच जान्हवीच्या साऊथ फिल्म इंड्स्ट्रीत पदार्पणाच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर ती साऊथ फिल्ममध्ये झळकणार आहे.

जान्हवीचा २०२२ मध्ये 'मिली' हा सिनेमा आला होता. यातील जान्हवीच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं. लवकरच ती वरुण धववन सोबत 'बवाल' या सिनेमात दिसणार आहे.याशिवाय तिचा 'मिस्टर अँड मिसेस माही' हा सिनेमाही रिलीज होणार आहे.

Web Title: Janhvi Kapoor JR NTR movie NTR 30 shoot starts actress shared photos on social media