VIDEO : मेकअप आर्टिस्टसोबत भांडभांड 'भांडली' जान्हवी कपूर, व्हायरल झाला दोघींचा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:31 IST2021-11-29T16:29:41+5:302021-11-29T16:31:13+5:30
Janhvi Kapoor : जान्हवी तिच्या मेअकप आर्टिस्टसोबत वाद घालताना दिसत आहे. आता तुम्ही हैराण झाले असाल की, तिने तिचा भांडणाचा व्हिडीओ का शेअर केला असेल?

VIDEO : मेकअप आर्टिस्टसोबत भांडभांड 'भांडली' जान्हवी कपूर, व्हायरल झाला दोघींचा व्हिडीओ
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) मस्तीखोर स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. इन्स्टाग्रामवर ती तिच्या मैत्रिणींसोबतचे मजेदार व्हिडीओ शेअर करत असते. यावेळी जान्हवी कपूर तिच्या मेकअप आर्टिस्टसोबत 'भांडताना' दिसली आहे. तिने एक व्हिडीओ शेअर केलाय, ज्यात जान्हवी तिच्या मेअकप आर्टिस्टसोबत वाद घालताना दिसत आहे. आता तुम्ही हैराण झाले असाल की, तिने तिचा भांडणाचा व्हिडीओ का शेअर केला असेल?
जान्हवीचा हा व्हिडीओ फेक वर्बल फाइट आहे. तिने बिग बॉस स्पर्धक ५ मधील स्पर्धक मॉडल पूजा मिश्रा (Pooja Mishra) आणि सोनाली नगरानीच्या भांडणाला आपल्या मेकअप आर्टिस्टसोबत इनॅक्ट केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला ट्रेंड 'पूजा व्हॉट इज दिस बिहेविअर?'ला जान्हवीने कॉपी केलं आहे. ज्यात तिची आणि मेकअप आर्टिस्टची फेक बाचाबाची दाखवली आहे. या फेक फाइटमध्ये जान्हवी आपल्या मेकअप आर्टिस्टकडे बोट दाखवताना दिस आहे. एकंदर सांगायचं तर जान्हवीने तंतोतंत पूजाची नक्कल केली आहे.
जान्हवीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तुम्हाला काय वाटतं की, मला मदतीची गरज आहे'. आता जान्हवीचा हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की, ती किती मस्तीखोर आहे. जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरने बहिणीची गंमत करत एक सायलेंट इमोजीसोबत 'हो' म्हटलं आहे. तिच्या फॅन्सना हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे.
वर्कफ्रन्टबाबत सांगायचं तर जान्हवी कपूरने नुकतंच तिच्या आगामी Mili सिनेमाचं शूटींग पूर्ण केलं आहे. हा सिनेमा जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर यांनी प्रोड्यूस केला आहे. त्यासोबत जान्हवी येणाऱ्या गुडलक जेरी, मिस्टर अॅन्ड मिसेज माही आणि दोस्ताना या सिनेमात दिसणार आहे.