अप्रतिम! 'परमसुंदरी'मधील नव्या गाण्यावर थिरकली जान्हवी कपूर! चाहत्यांकडून होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 19:08 IST2025-07-31T19:07:24+5:302025-07-31T19:08:04+5:30
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिचा आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे चर्चेत आहे.

अप्रतिम! 'परमसुंदरी'मधील नव्या गाण्यावर थिरकली जान्हवी कपूर! चाहत्यांकडून होतंय कौतुक
Janhvi Kapoor Video : अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिचा आगामी परमसुंदरी चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा पहिला प्रोमो प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांच्या मनात या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यात परमसुंदरीमधील परदेसीयॉं हे नवंकोरं गाणं सिनेरसिकांच्या भेटीला आलं आहे. अशातच आता जान्हवी कपूरसोशल मीडियावर चर्चेत आली आहे. याच गाण्यावर सुंदर सादरीकरण करत अभिनेत्रीने व्हिडीओ बनवला आहे.
नुकताच सोशल मीडियावर जान्हवीने तिचा डान्स करतानाचा सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी परमसुंदरी चित्रपटातील परदेसीयॉं या गाण्यावर थिरकताना दिसते आहे. कथ्थक नृत्य करत जान्हवीने अप्रतिम सादरीकरण केलं आहे. दरम्यान, सोशल मीडियावर जान्हवीचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. तिचं नृत्य पाहून नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केलं आहे. जान्हवीच्या या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिलंय, "एकदम फॅब्यूलस डान्स...", तर आणखी एका यूजरने म्हटलंय, "परमसुंदरी..." अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, 'परम सुंदरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं आहे. तुषार जलोटा यांनी यापूर्वी अभिषेक बच्चन अभिनीत 'दसवी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याची गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.