Janhavi Kapoor : पांढऱ्या साडीत जान्हवीचे हॉट फोटोशूट, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगाही झाला फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 11:01 IST2023-01-22T11:01:00+5:302023-01-22T11:01:55+5:30

पांढरी साडी आणि सोनेरी रंगाचा काठ, मोकळे केस, थोडी मेकअप आणि गळ्यात एक हार अशा साऊथ इंडियन लुकमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे.

janhavi kapoor latest photoshoot in white saree in south indian look taking internet on storm boyfriend comments | Janhavi Kapoor : पांढऱ्या साडीत जान्हवीचे हॉट फोटोशूट, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगाही झाला फिदा

Janhavi Kapoor : पांढऱ्या साडीत जान्हवीचे हॉट फोटोशूट, माजी मुख्यमंत्र्याचा मुलगाही झाला फिदा

Janhavi Kapoor :  बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर स्टारकिड्सपैकी एक. मात्र सध्या तिच्या अभिनयामुळे तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'धडक' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारी जान्हवी हळूहळू चांगला अभिनय करताना दिसत आहे. नुकताच रिलीज झालेल्या 'मिली' या सिनेमात तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. याशिवाय जान्हवीचे सोशल मीडियावरील बोल्ड फोटोही चर्चेत असतात. नुकतेच तिने पांढऱ्या साडीत केलेले फोटोशूट व्हायरल झाले आहे.

पांढऱ्या साडीत जान्हवी दिसते हॉट

जान्हवी कपूरने नुकतेच केलेले फोटोशूट खूपच चर्चेत आहे. पांढऱ्या साडीत ती खूप सुंदर दिसत असून अनेक सेलिब्रिटी तिच्या फोटोंवर कमेंट करत आहेत. तर चाहते तिच्या या लुकवर घायाळ झालेत. दाक्षिणात्य स्टाईलमध्ये तिचा हा लुक बघायला मिळत आहे. पांढरी साडी आणि सोनेरी रंगाचा काठ, मोकळे केस, थोडी मेकअप आणि गळ्यात एक हार अशा साऊथ इंडियन लुकमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे. इतकंच नाही तर ही साडी नेसून ती पाण्यात उतरली आहे. या फोटोशूटमध्ये जान्हवी खरंच खूप आकर्षक दिसत आहे.

जान्हवीच्या फोटोशूटवर बॉयफ्रेंड फिदा 

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) याच्यासोबत जान्हवीचे अफेअर असल्याच्या चर्चा अनेक काळापासून रंगल्या आहेत. दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले आहेत. कधी पार्टीतून एकत्रच बाहेर येताना तर कधी चोरी छुपे भेटताना दोघेही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. जाव्हवीच्या या लेटेस्ट फोटोशूटवर शिखरनेही कमेंट केली आहे. त्याने दोन hearts टाकत तिच्यावर प्रेम उधळले आहे. अर्थात ती फोटोंमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की शिखरही पुन्हा तिच्या प्रेमात पडला आहे. मात्र अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची कबुली दिलेली नाही.

जान्हवीच्या या फोटोंवर इतरही सेलिब्रिटिंनी कमेंट केली आहे. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिलाही जान्हवीचे फोटो आवडले आहेत. तर जान्हवीचा बेस्ट फ्रेंड ओरी (Orry) ने 'वाह वाह जान्हवी जी' अशी कमेंट केली आहे. तर तिची बेस्ट फ्रेंड शनाया कपूरने (Shanaya Kapoor) 'wow' अशी कमेंट केली आहे. 

Web Title: janhavi kapoor latest photoshoot in white saree in south indian look taking internet on storm boyfriend comments