जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 17:46 IST2024-09-18T17:44:52+5:302024-09-18T17:46:04+5:30
नुकतंच शिखर सोलापूरात त्याच्या आजोळी पोहचल्याचं पाहायला मिळालं.

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर
अभिनेत्री जान्हवी कपूर ही शिखर पहारियाला डेट करत आहे. जान्हवीला शिखरसोबत अनेक ठिकाणी स्पॉट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर जान्हवीने जाहीरपणे आपल्या प्रेमाची कबुलीही दिली आहे. जान्हवीसोबतच शिखरदेखील कायम चर्चेत असतो. नुकतंच शिखर सोलापूरात त्याच्या आजोळी पोहचल्याचं पाहायला मिळालं.
जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखरचं सोलापूराशी खास नातं आहे. सोलापूर हे शिखरचे आजोळ आहे. सोलापूरातील शिंदे घराशी शिखर पहाडियाचं कनेक्शन आहे. शिखर हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. अर्थात प्रणिती शिंदे शिखरची सख्खी मावशी आहे.
शिखरने नुकतंच सोशल मीडियावर प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यानं सर्वांच लक्ष वेधून घेतलं. यामध्ये शिखर हा आपल्या मावशी प्रणिती शिंदेंसोबत गणपतीचं विसर्जन करताना दिसून येत आहे. यावळी शिखर हा गुलाबी कुर्ता पायजामामध्ये पाहायला मिळाला. शिखरचं आपल्या मावशीसोबत खास नातं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी विजय मिळवल्यावर शिखरने इन्स्टा स्टोरी ठेवत शुभेच्छा दिल्या होत्या. अवघ्या २६ वर्षाचा शिखर १० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ८४ कोटींचा मालक आहे. त्याचे इन्स्टाग्रामवरही ३ लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. शिखरला वीर नावाचा भाऊ असून तो लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.