स्मशानभूमीत पोहोचला जग्गू दादा, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 18:14 IST2018-07-06T18:08:45+5:302018-07-06T18:14:03+5:30

जॅकी श्रॉफ सध्या RAW च्या अर्थात ‘रोमियो अकबर वॉल्टर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  याच सेटवरचे अनेक फोटो समोर आले आहेत. 

jackie shroff shoot in cemetery see photos | स्मशानभूमीत पोहोचला जग्गू दादा, पण का?

स्मशानभूमीत पोहोचला जग्गू दादा, पण का?

जॅकी श्रॉफ सध्या RAW च्या अर्थात ‘रोमियो अकबर वॉल्टर’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. गुजरातच्या बडोदा येथे  या चित्रपटाच्या काही सीन्सचे शूटींग सुरु आहे. याच सेटवरचे अनेक फोटो समोर आले आहेत. यात जॅकी स्मशानभूमीत शूट करताना दिसतोय.

या चित्रपटाची कथा १९७० च्या दशकातील आहे़ यात जॅकी एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. तूर्तास जॅकी श्रॉफच्या हातात अनेक चित्रपट आहेत. 

प्रभास स्टारर ‘साहो’ या चित्रपटात जॅकी दिसणार आहे. याशिवाय ‘पलटन’, ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’ या चित्रपटातही तो आहे. 

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये टायगर श्रॉफ लीड रोलमध्ये आहे, हे तुम्हाला ठाऊक असेलच. त्यामुळे या चित्रपटात जॅकी व टायगर ही बापलेकाची जोडी एकत्र दिसणार आहे.
‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटात जॉन अब्राहम लीड रोलमध्ये आहे. याशिवाय मौनी रॉय हिचीही वर्णी लागली आहे.

‘रोमियो अकबर वॉल्टर’ या चित्रपटात जॉनच्या आधी सुशांत सिंग राजपूतला साईन केले गेले होते. पण काही कारणास्तव सुशांतने हा चित्रपट सोडला आणि ‘रोमियो अकबर वॉल्टर’ जॉनला मिळाला. या चित्रपटात जॉन अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. २६ वर्षांपासून ती ८५ वर्षांपर्यंत त्याचे आठ वेगवेगळे लूक यात पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता दिसून येतेय. त्यातचं आता यात मौनी दिसणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे/
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड'मधून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यानंतर ती रणबीर कपूरच्या  ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: jackie shroff shoot in cemetery see photos