Mauni Raichi hatrick! Akshay, Ranbir Kapoor to play with the actor! | मौनी रायची हॅट्रिक ! अक्षय, रणबीरनंतर या अभिनेत्यासोबत करणार आॅनस्क्रीन रोमान्स!!

टीव्हीची ‘नागिन’ मौनी राय हिचे नशीब सध्या जोरावर दिसतेय. होय, टीव्हीवरून मौनीने बॉलिवूडमध्ये मोर्चा वळवला आणि आता हळूहळू बॉलिवूडमध्ये ती जम बसवू पाहतेय. मौनी आधीच दोन बॉलिवूडच्या सिनेमांत बिझी आहे. ताजी खबर मानाल तर आता मौनीच्या हाती तिसरा सिनेमा लागला आहे. होय, म्हणजे मौनी बॉलिवूडमध्ये हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे. जॉन अब्राहमच्या ‘रोमियो अकबर वॉल्टर’ या चित्रपटात मौनीची वर्णी लागल्याची खबर आहे. ‘परमाणु’च्या यशानंतर जॉन लवकरच आपल्या या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे. या चित्रपटाच्या लीड हिरोईनसाठी अनेक दिवसांपासून शोध सुरू होता़ पण आता कदाचित हा शोध संपलायं. या चित्रपटासाठी मौनीचे नाव फायनल झाल्याचे कळतेय.

ALSO READ : मौनी रायने इतके घटवले वजन की ओळखणेही झाले कठीण!!

‘रोमियो अकबर वॉल्टर’ या चित्रपटात जॉनच्या आधी सुशांत सिंग राजपूतला साईन केले गेले होते. पण काही कारणास्तव सुशांतने हा चित्रपट सोडला आणि ‘रोमियो अकबर वॉल्टर’ जॉनला मिळाला. या चित्रपटात जॉन अगदी वेगळ्या लूकमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. २६ वर्षांपासून ती ८५ वर्षांपर्यंत त्याचे आठ वेगवेगळे लूक यात पाहायला मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता दिसून येतेय. त्यातचं आता यात मौनी दिसणार म्हटल्यावर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे/
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'गोल्ड'मधून मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. त्यानंतर ती रणबीर कपूरच्या  ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे.
मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. Web Title: Mauni Raichi hatrick! Akshay, Ranbir Kapoor to play with the actor!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.