आशिष विद्यार्थीनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्न; १० वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 13:48 IST2023-05-28T13:47:41+5:302023-05-28T13:48:21+5:30
Snehal rai: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय साऱ्यांनाच ठावूक असेल. इश्क का रंग सफेद’ या मालिकेतून ती नावारुपाला आली.

आशिष विद्यार्थीनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं 21 वर्षांनी मोठ्या नेत्याशी लग्न; १० वर्षानंतर केला खुलासा
प्रसिद्ध अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish vidhyarthi) यांनी अलिकडेच वयाच्या ५८ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांमध्ये त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे, यामध्येच आता एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्या लग्नाविषयी खुलासा केला आहे. या अभिनेत्री तिच्यापेक्षा वयाने २१ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजकीय नेत्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचा खुलासा तिने तब्बल १० वर्षांनंतर केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय ( snehal rai) साऱ्यांनाच ठावूक असेल. इश्क का रंग सफेद’ या मालिकेतून ती नावारुपाला आली. अलिकडेच स्नेहलने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने राजकीय नेते माधवेंद्र राय यांच्यासोबत लग्नगाठ बांधल्याचं सांगितलं. तसंच १० वर्ष हे नातं सर्वांपासून का लपवलं हे सुद्धा सांगितलं.
"मी माझ्या लग्नाविषयी कोणतीच गोष्ट लपवली नाही. किंवा मी कधीच माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी सार्वजनिकरित्या चर्चा केली नाही. मी माझ्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. मी वयाच्या २३ व्या वर्षी लग्न केलं. परंतु, लग्नानंतर करिअर संपतं असं जे म्हटलं जातं त्यावर माझा विश्वास नाही. मला हे योग्य वाटत नाही", असं स्नेहल म्हणाली.
दरम्यान, स्नेहल राय आणि माधवेंद्र यांती लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेला शोभावी अशी आहे. अभिनेत्री होण्यापूर्वी स्नेहल एक अँकर होती. दिल्लीतील एका कार्यक्रमात ती सूत्रसंचालन करत होती. यावेळी माधवेंद्र यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात माधवेंद्र यांचं नाव घेतांना ती अडखळली होती. त्यानंतर त्यांची भेट फ्लाइटमध्ये झाले. या भेटीचं मैत्रीत आणि पुढे प्रेमात रुपांतर झालं.