इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:24 IST2025-02-19T13:23:25+5:302025-02-19T13:24:18+5:30

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर १९ महिन्यांनी इशिता पुन्हा प्रेग्नंट आहे.

Ishita Dutta is pregnant for the second time Vatsal Sheth expressed his joy | इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

इशिता दुसऱ्यांदा होणार आई; वत्सल सेठ म्हणाला, "गुडन्यूज मिळाल्यावर आम्ही जरा वेळ घेतला..."

मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे वत्सल सेठ (Vatsal Sheth)  आणि इशिता दत्ता(Ishita Dutta). दीड वर्षांपूर्वीच दोघं आईबाबा झाले. इशिताने गोंडस मुलाला जन्म दिला. आता पहिल्या लेकाच्या जन्मानंतर १९ महिन्यांनी इशिता पुन्हा गरोदर आहे. ३४ व्या वर्षी ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली. दोन्ही कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. इशिताने जेव्हा वत्सलला ही गुडन्यूज दिली तेव्हा त्याची काय रिॲक्शन होती हे त्याने नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत वत्सल सेठ म्हणाला, "हे माझ्यासाठी सरप्राईजच होतं. एकदम चांगलं सरप्राईज. खरंतर इशिताने मला प्रेग्नंसीविषयी सांगितलं तेव्हा मला सुखद धक्काच बसला. काहीच समजत नव्हतं. एक वडील म्हणून माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती आणि जेव्हा मी भानावर आलो तेव्हा खूप खूश झालो. इशिता आमच्या खोलीत आली आणि तिने ही  आनंदाची बातमी दिली. तेव्हा आमचा वायू कंटाळला होता आणि रडत होता. आधी आम्ही हे समजून घ्यायला आणि ॲडजस्ट व्हायला वेळ घेतला. नंतरच सर्वांना सांगायचा निर्णय घेतला. जुलै महिन्यात इशिता दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे."


तो पुढे म्हणाला, "आईवडील म्हणून आमच्यासाठी ही दुसरी प्रेग्नंसी थोडी वेगळी असणार आहे.  एक वडील म्हणून मी होणाऱ्या बाळाची, पत्नीची आणि वायूची पूर्ण काळजी घेईन. बाळाच्या जन्मानंतर मी वायूकडे लक्ष देईन आणि इशिता बाळाकडे असं आम्ही ठरवलं आहे. "

इशिता दत्ता आणि वत्सल सेठ २०१७ साली लग्नबंधनात अडकले. वत्सलने अजय देवगणसोबत 'टार्झन द वंडर कार' मध्ये काम केले होते. त्यात तो त्याचा मुलगा होता. तर इशिता 'दृश्यम' मध्ये अजय देवगणच्याच मुलीच्या भूमिकेत झळकली होती. हे गोड कपल आता पुन्हा आईबाबा होणार आहेत.

Web Title: Ishita Dutta is pregnant for the second time Vatsal Sheth expressed his joy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.