...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 11:40 AM2023-06-24T11:40:54+5:302023-06-24T11:41:23+5:30

Vicky Kaushal And Katrina Kaif : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. त्यांच्याबद्दलचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Is Katrina Kaif unhappy about getting married to Vicky Kaushal?, the tweet is going viral | ...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच!

...म्हणे कतरिना लग्नानंतर खूश नाही; भलताच दावा करणारं ट्विट व्हायरल, पण सत्य वेगळंच!

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेते विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) हे बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय एक आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. त्याच वेळी, विकी देखील आपल्या पत्नीवर प्रेम व्यक्त करण्यात कधीही मागे हटत नाही. पण अलीकडेच दोघांच्या वैवाहिक आयुष्याबाबत असे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, ज्यामुळे चाहते हैराण झाले आहेत. विकी आणि कतरिनाचे वैवाहिक आयुष्य चांगले चालले नसल्याचे ट्विटमध्ये सांगण्यात आले.

उमेर संधू नावाच्या ट्विटर हँडलवरून हे ट्विट करण्यात आले आहे, ज्यामध्ये लिहिले आहे, 'ब्रेकिंग न्यूज: कतरिना कैफ तिच्या वैवाहिक जीवनात खूश नाही. विकी कौशलच्या जवळच्या क्रू मेंबरच्या म्हणण्यानुसार, कतरिना आणि विकी यांच्यात मतभेद होत असून कतरिनासोबत झालेल्या भांडणानंतर विकी कौशलने दोन दिवसांपूर्वी त्याचा फोनही तोडला होता. उमेर संधूच्या या ट्विटवर कुणी आश्चर्य व्यक्त केले असले तरी कुणीतरी त्याला उलट ट्रोल केले. पण या ट्विटचे सत्य काय आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

निराधार वृत्त

बॉलिवूड लाइफच्या मते, ही बातमी पूर्णपणे निराधार आहे. कतरिना आणि विकी सध्या सुट्टीवर आहेत. 'जरा हटके जरा बचके'च्या यशानंतर दोघांनीही आपली कमिटमेंट्स पूर्ण केली आहेत आणि क्वालिटी टाइम घालवण्यासाठी व्हॅकेशनवर गेले आहेत.

वर्कफ्रंटबद्दल

विकी कौशल नुकताच सारा अली खानसोबत 'जरा हटके जरा बचके'मध्ये दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगले कलेक्शन केले. तर कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ही अभिनेत्री लवकरच सलमान खानसोबत 'टायगर ३' मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री आलिया भटही प्रियांका चोप्रासोबत 'जी ले जरा'मध्ये दिसणार आहे. 

Web Title: Is Katrina Kaif unhappy about getting married to Vicky Kaushal?, the tweet is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.