घटस्फोटानंतर बरखा बिष्ट-इंद्रनील सेनगुप्ता एकत्र सिनेमात झळकणार, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 14:32 IST2024-07-26T14:30:20+5:302024-07-26T14:32:36+5:30
14 वर्षांचा संसार मोडत बरखा आणि इंद्रनीलने 2022 साली घटस्फोट घेतला

घटस्फोटानंतर बरखा बिष्ट-इंद्रनील सेनगुप्ता एकत्र सिनेमात झळकणार, अभिनेत्री म्हणाली...
सेलिब्रिटी कपल इंद्रनील सेनगुप्ता (Indraniel Sengupta) आणि बरखा बिष्ट (Barkha Bisht) यांचा 2022 साली घटस्फोट झाला. २०२० सालापासूनच ते वेगवेगळे राहत होते. १४ वर्षांचा संसार मोडत त्यांनी घटस्फोट घेतला. दोघांना एक मुलगीही आहे. बरखा एकटीने लेकीचा सांभाळ करत आहे. नुकतंच अभिनेत्री बरखा बिष्टने मुलाखतीत तिच्या घटस्फोटावर भाष्य केले. विशेष म्हणजे बरखा आणि इंद्रनील यांचा घटस्फोटानंतर 'चलती रहे जिंदगी' हा सिनेमा रिलीज होतोय. यावरही तिने भाष्य केले.
'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत बरखा म्हणाली, "पहिली गोष्ट मी आणि इंद्रनीलने घटस्फोटानंतर सोबत काम केलेलं नाही. तो सिनेमा आमच्या घटस्फोटाच्या आधीच शूट झाला होता. भविष्यात मी इंद्रनीलसोबत काम करणार नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे. "
ती पुढे म्हणाली, "मी आता आयुष्यात पुढे गेले आहे. मला आशा आहे की मी आणि इंद्रनील चांगले मित्र राहू. मी आयुष्यातले १५ वर्ष इंद्रनीलसोबत घालवले. व्यक्ती म्हणून तो खूप चांगला आहे. त्यामुळे आमच्यातला वाद मिटावा असं मला वाटतं."
इंद्रनील आणि बरखा यांच्या घटस्फोटाचं कारण इंद्रनीलचे विवाहबाह्य संबंध होते असं म्हणतात. इंद्रनील आणि बंगाली अभिनेत्री ईशा साहा एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र अद्याप दोघानी यावर अधिकृत भाष्य केलेलं नाही.
बरखा आणि इंद्रनील 'प्यार के दो नाम एक राधा और एक श्याम' मालिकेच्या सेटवर भेटले होते. इथूनच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. काही वर्ष डेट केल्यानंतर 2008 साली त्यांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर बरखाने मुलीला जन्म दिला जिचं नाव मीरा आहे.