Homebound in Oscar Race: भारताच्या पदरी निराशा! 'होमबाउंड' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:26 IST2026-01-23T10:24:30+5:302026-01-23T10:26:34+5:30

'होमबाउंड' सिनेमा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम नामांकन लिस्टमध्ये 'होमबाउंड' सिनेमाला स्थान मिळवता आले नाही

India’s Homebound movie out of Oscar 2026 Race not getting nomination | Homebound in Oscar Race: भारताच्या पदरी निराशा! 'होमबाउंड' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

Homebound in Oscar Race: भारताच्या पदरी निराशा! 'होमबाउंड' सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर

भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. ऑस्कर २०२६ च्या शर्यतीत भारताचे अधिकृत प्रतिनिधित्व करणारा आणि टॉप-१५ चित्रपटांमध्ये स्थान मिळवून मोठी आशा निर्माण करणारा 'होमबाउंड' (Homebound) हा चित्रपट अंतिम ५ नामांकनांच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ९८ व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकन यादीत 'होमबाउंड' चित्रपटाला स्थान मिळवता आले नाही. 

करण जोहरची भावूक प्रतिक्रिया

या निकालानंतर चित्रपटाचा निर्माता करण जोहर भावुक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर आपली भावना व्यक्त करताना म्हटले की, "ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे की 'होमबाउंड' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण माझ्यासाठी हा भारतातील आजवरच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने आम्हाला जो सन्मान मिळवून दिला, त्याचा मला अभिमान आहे." करणने दिग्दर्शक नीरज घायवान आणि संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत.

नीरज घायवान दिग्दर्शित 'होमबाउंड' चित्रपटाने जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावले होते. कान चित्रपट महोत्सवात (Cannes Film Festival) या चित्रपटाला ९ मिनिटे उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना देण्यात आली होती. त्यानंतर टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांचं लक्ष वेधलं. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात अंतिम १५ चित्रपटांच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळवणारा हा अलीकडच्या काळातील महत्त्वाचा भारतीय चित्रपट ठरला होता.

चित्रपटाची कथा आणि कलाकार

'होमबाउंड' हा चित्रपट उत्तर प्रदेशातील दोन बालमित्रांची कथा सांगतो. पोलीस दलात भरती होण्याचं या मित्रांंचं स्वप्न असतं. यामध्ये जातीभेद, सामाजिक संघर्ष आणि मैत्रीचे विविध पैलू मांडण्यात आले आहेत. पुढे कोरोनासारखी महामारी आल्यानंतर या मित्रांना जगण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो, याची हृदयस्पर्षी कहाणी  'होमबाउंड' चित्रपटात बधायला मिळाली. ईशान खट्टर, विशाल जेठवा आणि जान्हवी कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Web Title : ऑस्कर की दौड़ से बाहर 'होमबाउंड', भारत को निराशा

Web Summary : भारत की ऑस्कर उम्मीद 'होमबाउंड' अंतिम नामांकन से बाहर हो गई, जिससे करण जौहर निराश हैं। नीरज घायवान द्वारा निर्देशित, फिल्म ने कान्स और टोरंटो में प्रशंसा बटोरी। इसमें जाति और महामारी के बीच दोस्ती दिखाई गई है, जिसमें ईशान खट्टर और जान्हवी कपूर हैं।

Web Title : India's 'Homebound' Fails to Secure Oscar Nomination: Disappointment Ensues

Web Summary : India's Oscar entry, 'Homebound,' didn't make the final nomination list, disappointing Karan Johar. The film, directed by Neeraj Ghaywan, previously garnered acclaim at Cannes and Toronto festivals. It portrays a friendship amidst caste and pandemic challenges, starring Ishaan Khattar and Janhvi Kapoor.