हानिया आमिरचं इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन' होताच चाहत्यांनी शोधला 'जुगाड', जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:47 IST2025-05-05T11:46:39+5:302025-05-05T11:47:14+5:30

भारतीय चाहत्यांचं प्रेम पाहून हानिया आमिरनं दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे.

India Bans Hania Aamir Instagram Indian Fans Use Vpn Pakistani Celebrity Profiles | हानिया आमिरचं इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन' होताच चाहत्यांनी शोधला 'जुगाड', जाणून घ्या

हानिया आमिरचं इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन' होताच चाहत्यांनी शोधला 'जुगाड', जाणून घ्या

India Bans Hania Aamir Instagram: गेल्या २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण आतंकी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेतला. यात अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यात आले. या यादीत हानिया आमिर, माहिरा खान, फवाद खान, राहत फतेह अली खान आणि अली झफर यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांचा समावेश आहे. पण, या कलाकारांची भारतात मोठी फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळे भारतीय चाहत्यांना आपल्या आवडत्या कलकाराचं इन्स्टाग्राम प्रोफाइल पाहता येत नव्हतं. पण, आता भारतीय फॅन्सनी नवा मार्ग शोधून काढला आहे. 

पाकिस्तानी कलाकारांचं सोशल मीडिया बॅन करण्यात आल्यानं आता जेव्हा एखादा भारतीय सोशल मिडिया युजर त्याच्या आवडीच्या कोणत्याही पाकिस्तानी सेलिब्रिटीच्या अकाऊंट शोधतो, तेव्हा त्याला "ही प्रोफाइल भारतात उपलब्ध नाही. हे कायदेशीर आदेशांमुळे करण्यात आले आहे", असं नोटीफिकेशन दिसतं. यामुळे अनेक चाहते नाराज झाले. कारण आता त्यांना त्यांच्या आवडत्या कलाकारांचे अपडेट्स मिळत नाहीयेत. पण, निराश न होता अनेक भारतीय चाहत्यांनी VPN (Virtual Private Network) वापरणं सुरू केलं. 

भारतीय चाहत्यांना पुन्हा हानिया आमिर आणि इतर कलाकारांचे अकाउंट्स (Indian Fans Use Vpn Pakistani Celebrity Profiles Hania Aamir) पाहता येत आहेत. तसेच भारतीय चाहत्यांनी हानियाच्या पोस्ट्सवर कमेंट्सचा वर्षाव केलाय.  कोणी लिहिलं, "तुमची खूप आठवण येते", तर कुणी मजेशीरपणे लिहिलं, "तुमच्यासाठी VPN घेतलं". चाहत्यांचं हे प्रेम पाहून हानिया आमिरसुद्धा भावूक झाली आणि तिने चाहत्यांच्या कमेंट्सना उत्तर देत लिहिलं, "मी रडेन... खूप प्रेम". हानियाचा प्रतिसाद पाहून भारतीय चाहते तिच्या आणखीनच प्रेमात पडले आहेत. 

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरबद्दल सांगायचं तर, पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देणारी ती पहिली पाकिस्तानी कलाकार होती. या हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना काम करण्यास सरकारने बंदी घातल्याने हानियाच्या हातून 'सरदार जी ३' हा सिनेमा गेला. हानिया केवळ २८ वर्षांची आहे. एवढ्या कमी वयात तिने खूप यश मिळवलं आहे. 'दिलरुबा', 'तितली', 'इश्किया', 'मुझे प्यार हुआ था' आणि 'कभी मै कभी तुम'या पाकिस्तानी मालिकांमध्ये तिने काम केले आहे. सध्या ती पाकिस्तानातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. हानिया वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. हानिया भारतीय रॅपर बादशाहला (Badshah) डेट करत असल्याची मध्यंतरी चर्चा रंगली होती.

 

 

Web Title: India Bans Hania Aamir Instagram Indian Fans Use Vpn Pakistani Celebrity Profiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.