IND vs PAK: मॅचसाठी काहीपण! ऍड शूटच्या सेटवर धोनी अन् सनीने पाहिला सामना (व्हिडिओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 17:39 IST2025-02-23T17:38:59+5:302025-02-23T17:39:26+5:30

माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीने जाहिरातीच्या शूटमधून वेळ काढत मॅच पाहण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे त्याच्या जोडीला चक्क अभिनेता सनी देओलही येऊन बसला.

IND vs PAK m s dhoni and Sunny deol watching match together on the set of an ad shoot | IND vs PAK: मॅचसाठी काहीपण! ऍड शूटच्या सेटवर धोनी अन् सनीने पाहिला सामना (व्हिडिओ)

IND vs PAK: मॅचसाठी काहीपण! ऍड शूटच्या सेटवर धोनी अन् सनीने पाहिला सामना (व्हिडिओ)

Ind vs Pakआजचा रविवार क्रिकेटप्रेमींसाठी आणि संपूर्ण देशवासियांसाठीच खास आहे. कारण आज दुबईत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगला आहे. हा सामना म्हणजे दोन्ही देशांसाठी अगदी महत्वाचा असतो. क्रिकेटप्रेमी तर सकाळपासूनच टीव्हीसमोर खिळून बसतात. दुपारी दीड वाजता सामना सुरु झाला असून पाकिस्तानची पहिली बॅटिंग सुरु आहे. दरम्यान मुंबईत एका जाहिरातीच्या शूटदरम्यान वेगळंच चित्र पाहायला मिळालं. माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनीने (M S Dhoni) जाहिरातीच्या शूटमधून वेळ काढत मॅच पाहण्याचा आनंद घेतला. विशेष म्हणजे त्याच्या जोडीला चक्क अभिनेता सनी देओलही (Sunny Deol) येऊन बसला. 

एमएस धोनी आणि सनी देओलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. एका जाहिरातीच्या शूटचा हा सेट दिसतोय. समोर प्रोजेक्टरवर भारत विरुद्ध पाक मॅच लावली आहे. धोनीसोबत सेटवरील सर्व क्रू मॅच पाहत आहेत. तोच मागून सनी पाजीची एन्ट्री होते. पडद्यावर पाकिस्तानला धूळ चारणारा अभिनेता सनी देओल धोनीच्या सेटवर मॅच पाहायला येतो. हे दुर्मिळ दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. दोघांमध्ये मस्त गप्पा रंगलेल्या दिसत आहेत. तसंच मॅचचाही दोघं आनंद लुटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियालवर तुफान व्हायरल होतोय. 


भारत पाक सामना म्हणजे कायमच दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेचा सामना असतो. त्यामुळे याकडे सर्वांचंच लक्ष असतं. एकीकडे सनी पाजी आहेत ज्यांनी गदरमध्ये आपल्या प्रेमासाठी पाकिस्तानशी एकहाती लढा दिला होता. तर दुसरीकडे थाला एमएस धोनी आहे ज्याच्या कॅप्टन्सीची आजही चर्चा असते. असे दोन दिग्गज एकत्र येऊन सामना पाहतात तेव्हा तो क्षण नक्कीच खास असतो.  

सामन्याबद्दल सांगायचं तर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिजवानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बाबर आजमने चांगली सुरुवात केली मात्र नंतर त्याची जादू चालली नाही. हार्दिक पांड्याने त्याला ९ व्या ओव्हरमध्ये परत पाठवलं. त्याच्या पुढच्याच ओव्हरमध्ये इमाम उल हकही रन आऊट झाला.  

Web Title: IND vs PAK m s dhoni and Sunny deol watching match together on the set of an ad shoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.