'जब वी मेट'चं शूट संपण्याच्या २ दिवस आधी दोघांचं ब्रेकअप झालं, इम्तियाज अलीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:17 IST2025-03-19T15:15:28+5:302025-03-19T15:17:05+5:30

ब्रेकअपचा त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला का?

imtiaz ali once revealed shahid and kareena kapoor broke up before 2 days of jab we met wrapped up | 'जब वी मेट'चं शूट संपण्याच्या २ दिवस आधी दोघांचं ब्रेकअप झालं, इम्तियाज अलीचा खुलासा

'जब वी मेट'चं शूट संपण्याच्या २ दिवस आधी दोघांचं ब्रेकअप झालं, इम्तियाज अलीचा खुलासा

शाहिद कपूर-करीनाचा (Shahid Kapoor-Kareena Kapoor) सुपरहिट 'जब वी मेट' (Jab We Met) सिनेमा आजही तरुणांमध्ये तितकाच लोकप्रिय आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या सिनेमाला १८ वर्ष झाली आहेत. तरीही सिनेमाची क्रेझ, यातील डायलॉग, गाणी सगळं अजून चाहत्यांच्या मनात आहे. 'जब वी मेट' हा इम्तियाज अलीचा दुसरा सिनेमा होता. याआधी त्याने 'सोचा ना था' केला होता. 'जब वी मेट'वेळीच शाहिद आणि करीनाचं ब्रेकअप झालं होतं. याचा त्यांच्या परफॉर्मन्सवर परिणाम झाला का? याबद्दल इम्तियाज अलीने भाष्य केलं होतं.

'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज अली म्हणालेले की,  "जब वी मेट सिनेमा बऱ्याच जणांनी रिजेक्ट केला होता. अनेक कलाकार, निर्मात्यांनीही सिनेमाला नकार दिला होता. आधी मी बॉबी देओल आणि प्रिती झिंटाला घेऊन मला हा सिनेमा करायचा होता. नंतर मी शाहिदीकडे गेलो. मग करीनाची एन्ट्री झाली. सिनेमाच्या संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष शूट करण्यापर्यंत मला ५ वर्ष लागली."

शाहिद-करीनाच्या ब्रेकअपवर ते म्हणाले,"जब वी मेट' बराचसा शूट झाला होता. शूटिंगची फक्त दोन दिवस बाकी होती तेव्हा शाहिद-करीनाचं सो कॉल्ड ब्रेकअप झालं. ते खूप प्रोफेशनल आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरु आहे याचा त्यांनी कधीच परिणाम होऊ दिला नाही."

'जब वी मेट' शूट करतानाच करीना 'टशन' सिनेमाचंही शूट करत होती. तिथेच ती सैफ अली खानच्या प्रेमात पडली. करीना 'जब वी मेट' च्या सेटवरही टशनबद्दलच बोलायची. तिने त्या सिनेमासाठी झिरो साईजही केली होती. शेवटी करीनाचं नशीब बघा 'टशन' सुपरफ्लॉप झाला तर 'जब वी मेट' हिट झाला. मात्र तिला खऱ्या आयुष्यातला जोडीदार मिळाला.

Web Title: imtiaz ali once revealed shahid and kareena kapoor broke up before 2 days of jab we met wrapped up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.