"आजकाल यश फार.." रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर इम्तियाज अली-मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:23 IST2025-02-11T15:22:19+5:302025-02-11T15:23:05+5:30

चाहत्यांनी केलं कौतुक

Imtiaz ali and manoj bajpayee reacts to ranveer allahbadia s controversy | "आजकाल यश फार.." रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर इम्तियाज अली-मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

"आजकाल यश फार.." रणवीर अलाहाबादिया प्रकरणावर इम्तियाज अली-मनोज वाजपेयीची प्रतिक्रिया

कॉमेडियन समय रैनाच्या शोमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावरुन मोठा वादंग उसळला आहे. या शोविरुद्ध आणि समय-रणवीरविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देत कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. दरम्यान रणवीर अलाहबादियाने काल व्हिडिओ शेअर माफी मागितली. तरी आता तो प्रत्येकाच्याच निशाण्यावर आला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही याची निंदा केली आहे. नुकतंच दिग्दर्शक इम्तियाज अली (Imtiaz Ali) आणि अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee)  यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

इन्स्टंट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत इम्तियाज अली म्हणाले, "मला वाटतं शॉर्टकटमधून मिळालेली प्रसिद्धी ही शॉर्टटमच असते. ती तितक्याच लवकर निघूनही जाते. ज्याला जे करण्यात मजा येते त्याने तेच केलं पाहिजे. अश्लीलता नक्कीच वाईट आहे. काही लोक फारच अपरिपक्व असतात त्यामुळे त्यांच्या चुका इतक्या गांभीर्याने घेऊच नये."

मनोज वाजपेयी म्हणाले, "आजकाल यश फार लवकर मिळतं. यश स्वत:जवळ खेचून ठेवण्यात मजा आहे. जेणेकरुन नंतर त्याची मजा घेता येईल. त्यामुळे जे आज युवा, तरुण यश मिळवत आहेत त्यांनी जरा आजूबाजूला पाहावं, समजून घ्यावं. म्हणून मी नेहमी सांगतो की अरे. वर्तमानपत्र वाचत जा."

इम्तियाज अली पुढे म्हणाले, "मला वाटतं मनोजच्याच आयुष्यावरुन शिकलं पाहिजे की जे दीर्घकाळ टिकणारं यश असतं ना त्यात मजा आहे. दान केल्यानेच आपल्याला आशीर्वाद मिळतो. तसंच दीर्घकाळ यशाचं आहे. बरीच वर्ष आपण ते अनुभवू शकतो. एकदम उंचीवर पोहोचल्यानंतर आपण कायमचं खाली येत नाही. मेहनत आणि परिश्रमाने कमावलेल्या यशाच्या मागे जायला पाहिजे."

इम्तियाज अली आणि मनोज वाजपेयींच्या या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. 'हे आहेत मॅच्युअर्ड' असं म्हणत यांच्याकडून शिका असाही सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Imtiaz ali and manoj bajpayee reacts to ranveer allahbadia s controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.