घटस्फोट, डेटिंगच्या चर्चांवर अखेर इमरान खानने सोडलं मौन; गर्लफ्रेंडला सुनावणाऱ्यांवर भडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 09:30 IST2024-03-07T09:28:39+5:302024-03-07T09:30:20+5:30

त्याचा घटस्फोट कधी झाला आणि डेटिंगच्या चर्चा खऱ्या आहेत का? यावर तो म्हणाला...

Imran Khan talks about his relationship with Lekha Washington says this started after divorce | घटस्फोट, डेटिंगच्या चर्चांवर अखेर इमरान खानने सोडलं मौन; गर्लफ्रेंडला सुनावणाऱ्यांवर भडकला

घटस्फोट, डेटिंगच्या चर्चांवर अखेर इमरान खानने सोडलं मौन; गर्लफ्रेंडला सुनावणाऱ्यांवर भडकला

'जाने तू या जाने' फेम अभिनेता इमरान खान (Imran Khan) बऱ्याच काळापासून सिनेमांमधून गायब आहे. या सिनेमामुळे तो सर्वांच्या आवडीचा अभिनेता बनला होता. मात्र नंतर काही सिनेमे केल्यानंतर तो सिनेइंडस्ट्रीपासून दूर झाला. गेल्या काही वर्षांपासून तो पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचा फिटनेस, वैयक्तिक आयुष्य, फोटोशूट आणि बॉलिवूडमध्ये कमबॅक या कारणांमुळे तो चर्चेत आहे. नुकतंच व्होग मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

इमरान खानने लहानपणीची मैत्रीण अवंतिकाशी 2011 साली लग्न केले होते. त्यांना एक मुलगीही आहे. मात्र आता इमरान अभिनेत्री लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. त्याचा घटस्फोट कधी झाला आणि डेटिंगच्या चर्चा खऱ्या आहेत का? यावर तो म्हणाला, "हो हे खरं आहे. मी आणि लेखा रोमँटिक रिलेशनशिपमध्ये आहोत. माझा फेब्रुवारी 2019 मध्येच घटस्फोट झाला. तसंच मी आणि लेखा २०२० साली कोरोना लॉकडाऊनवेळी संपर्कात आलो होतो. तोपर्यंत माझा आणि माझ्या पत्नीच्या घटस्फोट झाला होता. लेखाला घर तोडनेवाली बोलणाऱ्यांना मला हे स्पष्ट करायचं होतं. अशा लोकांचा मला खूप राग येतो. याला महिलांचा आदर करणं म्हणत नाही."

इमरान आणि लेखा सध्या अनेक इव्हेंट्समध्ये हातात हात घालून येतात. त्यांनी अद्याप रिलेशनशिप ऑफिशियल केली नव्हती. पहिल्यांदाच इमरान व्होगशी यावर बोलला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचही इमरान खान गर्लफ्रेंड लेखाला घेऊन पोहोचला होता. इमरान खान आता लवकरच अभिनयात कमबॅक करणार आहे. त्याच्या कमबॅकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Imran Khan talks about his relationship with Lekha Washington says this started after divorce