"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:25 IST2025-09-03T13:24:11+5:302025-09-03T13:25:00+5:30

पहिल्या मुलाच्या जन्मानंतर काहीच महिन्यात पुन्हा गरोदर राहिलेली अभिनेत्री

ileana dcruz reveals she is not going to comeback in films soon as she is busy with her new born babies | "सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट

"सध्या कमबॅक करणार नाही...", दोन मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीचा निर्णय; लग्नाआधीच झालेली प्रेग्नंट

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आई झाल्यानंतरही करिअर सुरु ठेवलं आहे. करीना कपूर, आलिया भट असो किंवा काजोल, राणी मुखर्जी असो. तर काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांच्या कमबॅकची चाहते वाटत पाहत आहेत. त्यातच एक म्हणजे इलियाना डिक्रुझ (ileana Dcruz). इलियानाने २०२३ साली मुलाला जन्म दिला. लेकाच्या जन्मानंतर काही महिन्यातच ती पुन्हा गरोदर राहिली. यावर्षी जून मध्येच तिला दुसरा मुलगा झाला. इलियाना सध्या दोन्ही मुलांच्या पालनपोषणात व्यग्र आहे. सिनेमातील कमबॅकविषयी इलियाना काय म्हणाली?

नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये इलियाना डी क्रुझ नुकतीच सामील झाली होती. नेहा धुपिया 'फ्रीडम टू फीड' हे लाइव्ह सेशन घेते ज्यात ती न्यू मॉम सोबत गप्पा मारते, त्यांचा अनुभव जाणून घेते. मातृत्वाच्या भावनेवर इलियाना म्हणाली, "प्रेग्नंसीनंतरचा काळ सोपा नव्हता. मला आत्मविश्वास वाटत नव्हता आणि थकल्यासारखं झालं होतं. कधी कधी मला वाटतं की मी परफेक्ट आई नाही. मी अनेकदा रडायचे आणि विचार करायचे की मी हे योग्य करत आहे का? पण हळूहळू मला समजायला लागलं की असं वाटणं नॉर्मल आहे. हा मातृत्वाच्या प्रक्रियेचाच भाग आहे."

पुढे ती म्हणाली, "आताच सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करण्याचा माझा विचार नाही. सध्या मला माझ्या दोन्ही मुलांना वेळ द्यायचा आहे. खूप प्रेम द्यायचं आहे. मातृत्वाच्या आव्हानांचा अनुभव घ्यायचा आहे आणि आनंदही साजरा करायचा आहे."


इलियानाने सुरुवातीला पहिल्या प्रेग्नंसीची घोषणा केली होती. तोवर तिने नवऱ्याचं नावही सांगितलं होतं. नंतर तिने पती मायकल डोलनचा चेहरा रिव्हील केला. काही महिन्यातच तिने दुसऱ्या प्रेग्नंसीचीही हिंट दिली. इलियानाच्या पहिल्या मुलाचं नाव फीनिक्स डोलन आणि दुसऱ्या मुलाचं नाव कियानू राफे डोलन असं आहे. सध्या इलियाना कुटुंबासोबत परदेशात स्थायिक आहे. इलियाना शेवटची 'दो और दो प्यार' मध्ये दिसली. यामध्ये प्रतीक गांधी आणि विद्या बालन यांचीही मुख्य भूमिका होती.

Web Title: ileana dcruz reveals she is not going to comeback in films soon as she is busy with her new born babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.