‘...तर मी पत्रकार झालो असतो’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2016 16:22 IST2016-09-23T10:45:30+5:302016-09-23T16:22:23+5:30

आयुषमान खुराना हा एक उत्तम सुत्रसंचालक, अभिनेता आणि गायकही आहे. त्याच्या अभिनय कौशल्याने त्याने प्रत्येक क्षेत्र आत्मसात केले आहे. ...

'... I would have been a journalist' | ‘...तर मी पत्रकार झालो असतो’

‘...तर मी पत्रकार झालो असतो’

ुषमान खुराना हा एक उत्तम सुत्रसंचालक, अभिनेता आणि गायकही आहे. त्याच्या अभिनय कौशल्याने त्याने प्रत्येक क्षेत्र आत्मसात केले आहे. तो म्हणतो,‘ मी या क्षेत्रात अपघाताने आलो. मी जर गायक, अभिनेता नसलो असतो तर मी एक पत्रकार असलो असतो.

मी पंजाब युनिव्हर्सिटीमधून प्रिंट जर्नालिझममध्ये पदव्युत्तर पदविका संपादन केली आहे. मी टिपिकल पंजाबी मुंडा आहे. ज्याला बाईक रायडिंग प्रचंड आवडते. मी क्रुझरपेक्षा बाईक चा जास्त वेडा आहे.’

आयुषमानला त्याच्या फर्स्ट क्रशविषयी विचारण्यात आले असता तो म्हणाला,‘ आमच्या फिजिक्स क्लासमध्ये ती एक खुप हॉट होती. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ती होती पण तिचे माझ्यावर लक्ष असायचे. फायनली मी तिला प्रपोज केले आणि आज आम्हाला विराजवीरसारखा गोंडस मुलगा आहे. 

Web Title: '... I would have been a journalist'