'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 11:40 IST2025-12-11T11:40:05+5:302025-12-11T11:40:51+5:30
हृतिक रोशनने 'धुरंधर'चं पोस्टर शेअर करत लिहिले...

'धुरंधर' पाहून भारावला हृतिक रोशन; म्हणाला, "सिनेमाचा विद्यार्थी म्हणून खूप काही शिकलो..."
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. साडेतीन तासांचा हा सिनेमा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे. पाचच दिवसात सिनेमाने १६० कोटींचा बिझनेस केला आहे. अक्षय खन्नाच्या स्वॅगचं विशेष कौतुक होत आहे. इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी 'धुरंधर'चं कौतुक केलं. अक्षय कुमार, अनुपम खेर, यामी गौतम आणि इतर कलाकारांनी सिनेमावर प्रतिक्रिया दिली. तर आता हृतिक रोशननेही 'धुरंधर'वर स्तुतीसुमनं उधळली आहेत.
हृतिक रोशनने 'धुरंधर'चं पोस्टर शेअर करत लिहिले, "सिनेमा माझं आवडतं माध्यम आहे. मला असे लोक आवडतात जे एका चक्रव्ह्यूहात उतरतात आणि कथेला ताबा घेऊ देतात. फिरवतात, हलवतात जोपर्यंत त्यांना जे पाहायचंय ते स्क्रीनवर उतरत नाही. धुरंधर हे असंच एक उदाहरण आहे. मला स्टोरीटेलिंग खूप आवडली. हा सिनेमा आहे."

"मी कदाचित सिनेमावरुन होत असलेल्या राजकारणावर असहमत असू शकतो. या जगाचा एक नागरिक म्हणून फिल्ममेकरवर काय जबाबदाऱ्या असायला हव्यात यावर मी वाद घालू शकतो. तरीही मला हा सिनेमा खूप आवडला हे मी नाकारु शकत नाही आणि विद्यार्थी म्हणून मी यातून बरंच शिकलो. कमाल."
'धुरंधर'ला 'वायआरएफ'च्या स्पाय युनिव्हर्सपेक्षा कैक पटींनी चांगला सिनेमा म्हटलं जात आहे. हृतिक रोशन स्वत: वायआरएफच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. त्याने 'धुरंधर'चं कौतुक केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.