'फना' चित्रपटासाठी आमिर खान नाही 'या' अभिनेत्याची झालेली निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:27 IST2025-08-03T14:23:42+5:302025-08-03T14:27:38+5:30
आमिर खान नव्हे 'हा' अभिनेता होता 'फना' साठी पहिली पसंती, इतक्या वर्षांनी दिग्दर्शकांनी केला खुलासा

'फना' चित्रपटासाठी आमिर खान नाही 'या' अभिनेत्याची झालेली निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले...
Aamir Khan Movie: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा त्याच्या अभिनयासह हटके विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे देखील चर्चेत असतो. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत अभिनेत्याने अनेक सुपरहिट सिनेमे इंडस्ट्रीला दिले आहेत. परंतु, २००६ हे वर्ष अभिनेत्यासाठी खूपच खास ठरलं होतं. रंग दे बसंती सिनेमाच्या यशानंतर आमिर खान फना या रोमँटिक थ्रिलर चित्रपटात दिसला, ज्यामधील अभिनयाने त्याने प्रेक्षकांना प्रभावित केलं होतं. कुणाल कोहली दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि काजोलची मुख्य भूमिका होती. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. परंतु, या चित्रपटासाठी आमिर खान पहिली पसंती नव्हता. नुकताच याबाबत दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे.
'फना' हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्षे उलटली असली तरीही यामधील गाणी, संवाद प्रेक्षकांमध्ये आजही लोकप्रिय आहेत. अशातच फना चे दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी अलिकडेच फ्रायडे टॉकीज पॉडकास्ट मध्ये दरम्यान या चित्रपटा बद्दल काही किस्से शेअर केले. यावेळी सुरुवातीला आदित्य चोप्रा या फनामध्ये आमिर खानला नाही तर हृतिकला कास्ट करणार होते, पण त्याने ही ऑफर नाकारली. असं ते म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितलं, "जेव्हा आम्ही या चित्रपटाची ऑफर घेऊन हृतिककडे गेलो तेव्हा तो म्हणाला, 'मिशन काश्मीर प्रमाणेच याचं कथानक देखील काही अगदी सारखंच वाटत आहे. मला ते करायला हवं असं वाटत नाही.' असं म्हणत हृतिकने नकार दिला. "
त्यानंतर ते म्हणाले,'फनाची संपूर्ण स्क्रिप्ट आदित्य चोप्रा यांच्याकडे होती. मग मी त्यांना आपण आमिरला अप्रोच का करत नाही असं विचारलं. त्यानंतर संपूर्ण स्क्रिप्ट आम्ही त्याला सांगितली आणि त्याला ती आवडली. पण, त्याने यामध्ये हिंदी डायलॉग्ज असावेत अशी मागणी केली. त्यानंतर जवळपास एका आठवड्यात सगळे डायलॉग्ज तयार करण्यात आले. असा खुलासा त्यांनी केला.