हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:54 IST2026-01-26T12:50:14+5:302026-01-26T12:54:10+5:30

हृतिकची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून, आता स्वतः हृतिकने यावर प्रतिक्रिया देत आपल्या आरोग्याबाबत मोठे अपडेट दिले आहे.

Hrithik Roshan to walk with a hunchback The actor made a shocking revelation about his health, said... | हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला...

हृतिक रोशनवर कुबड्या घेऊन चालण्याची वेळ का आली? अभिनेत्याने केला मोठा खुलासा, म्हणाला...

बॉलिवूडचा 'ग्रीक गॉड' आणि फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जाणारा अभिनेता हृतिक रोशन सध्या एका गंभीर दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये तो कुबड्यांच्या साहाय्याने चालताना दिसत आहे. हृतिकची ही अवस्था पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून, आता स्वतः हृतिकने यावर प्रतिक्रिया देत आपल्या आरोग्याबाबत मोठे अपडेट दिले आहे.

नेमकं काय झालं?

शनिवारी रात्री हृतिक रोशन चित्रपट निर्माते गोल्डी बहल यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला होता. यावेळी तो नेहमीप्रमाणे कॅमेऱ्यासमोर पोज न देता, कुबड्यांच्या साहाय्याने हळूहळू चालत आपल्या कारच्या दिशेने जाताना दिसला. त्याला अशा स्थितीत पाहून सोशल मीडियावर "हृतिकला काय झाले?" असा प्रतिक्रियांचा पाऊस पडू लागला.

वाढत्या चर्चेनंतर हृतिकने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर करत आपल्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. त्याने मिश्किलपणे लिहिले, "माझ्या डाव्या गुडघ्याने काल रहस्यमयरीत्या अचानक दोन दिवसांची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे मला थोडा त्रास होत आहे. माझ्या या 'नॉर्मल' आयुष्यात तुमचे स्वागत आहे."


हृतिकने पुढे सांगितले की, ही समस्या त्याला जन्मापासूनच आहे. त्याच्या शरीरातील काही अवयव, विशेषतः डावा गुडघा, डावा खांदा आणि उजवा घोटा कधीकधी अचानक काम करणे थांबवतात. अवयवांचा स्वतःचा मूड असल्यासारखं आहे हे, ते कधीही बंद होऊ शकतात," असे त्याने नमूद केले. त्याने या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहत स्वतःला 'युनिक' म्हटले आहे.

हृतिक रोशन आपल्या फिटनेससाठी जगप्रसिद्ध आहे. वयाच्या ५२ व्या वर्षीही तो पडद्यावर अत्यंत कठीण ॲक्शन सीन आणि डान्स करताना दिसतो. गेल्या वर्षी 'वॉर २' च्या गाण्याचे शूटिंग करतानाही त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. चाहत्यांचे म्हणणे आहे की, हृतिक दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दुखापतीला सामोरे जात असतो, ज्यामुळे त्याच्या भविष्यातील प्रोजेक्ट्सवर परिणाम होऊ शकतो. हृतिक रोशन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित 'क्रिश ४' या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

Web Title : क्यों ऋतिक रोशन बैसाखी का सहारा ले रहे हैं? अभिनेता ने बताया कारण।

Web Summary : ऋतिक रोशन को घुटने की समस्या के कारण बैसाखी का उपयोग करते देखा गया। उन्होंने बताया कि यह एक आवर्ती समस्या है, जिसे उन्होंने मजाकिया ढंग से अपने घुटने की "छुट्टी" लेना बताया। चोटों के बावजूद, वह 'क्रिश 4' की तैयारी जारी रखे हुए हैं।

Web Title : Why Hrithik Roshan uses crutches? Actor reveals the reason.

Web Summary : Hrithik Roshan was seen using crutches due to a knee issue. He revealed it's a recurring problem, humorously calling it his knee taking a "holiday." Despite injuries, he continues preparing for 'Krrish 4'.