हृतिक रोशनने घेतली जॅकी चॅनची भेट, चाहते खूश; मजेशीर कॅप्शन लिहित म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:55 IST2025-10-27T14:55:01+5:302025-10-27T14:55:36+5:30
हृतिक रोशन आणि जॅकी चॅनचा हा फोटो पाहून चाहते भलतेच खूश झालेत

हृतिक रोशनने घेतली जॅकी चॅनची भेट, चाहते खूश; मजेशीर कॅप्शन लिहित म्हणाला...
अभिनेता हृतिक रोशनची 'ग्रीक गॉड' अशीही ओळख आहे. अभिनय, गुड लूक्स आणि डान्स टॅलेंट यामुळे तो सर्वदूर पोहोचला आहे. त्याचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. हृतिकच्या आगामी 'क्रिश ४'ची सर्वांनाच उत्सुकता आहे. विशेष म्हणजे हृतिक स्वत: या सिनेमाचं दिग्दर्शनही करणार आहे. दरम्यान हृतिकने नुकतीच ग्लोबल स्टार जॅकी चॅनची भेट घेतली. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हृतिक रोशन आणि जॅकी चॅनचा हा फोटो पाहून चाहते भलतेच खूश झालेत. दोन गुड लूकिंग आणि टॅलेंटेड स्टार्सना एकत्र पाहणं हा दुर्मिळ क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दोघांनी सारखीच टोपी कॅप घातली आहे. जॅकी चॅन व्हाईट टीशर्ट, त्यावर निळ्या जॅकेटमध्ये डॅशिंग दिसत आहे. तर हृतिक व्हाईट आऊटफिटमध्ये नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत आहे. या फोटोसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "फॅन्सी मीटिंग यू हियर जॅकी चॅन सर..माझी तुटलेली हाडं तुमच्या तुटलेल्या हाडांची आठवण काढतात. कायम खूप प्रेम."
दोघांनी आपापल्या सिनेमात जबरदस्त अॅक्शन सीन्स दिले आहेत आणि यात ते अनेकदा जखमीही झाले आहेत. म्हणूनच हृतिकने असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे. मार्शल आर्ट्स स्टार जॅकी जॅनचं 'कुंग फू फायटिंग' गाणं हृतिकने बॅकग्राऊंडला लावलं आहे. बेवरली हिल्स येथे हृतिकने जॅकी चॅन यांची भेट घेतली.
हृतिकने याआधी २०१९ सालीही जॅकी चॅनची भेट घेतली होती. चीनमध्ये त्यांची भेट झाली होती. आता ६ वर्षांनी पुन्हा दोन्ही स्टार एकत्र आले आहेत.'तुम्ही एकत्र सिनेमा करत आहात का?','दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये','क्रिश ४ मध्ये जॅकी चॅन सर' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.