हृतिक रोशन-किआरा अडवाणीचा इटलीतील व्हिडिओ व्हायरल, War 2 मधील रोमँटिक गाण्याचं शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 13:41 IST2024-09-24T13:40:29+5:302024-09-24T13:41:13+5:30
'वॉर २' मध्ये हृतिक रोशन-किआरा अडवाणी यांची फ्रेश जोडी दिसणार आहे.

हृतिक रोशन-किआरा अडवाणीचा इटलीतील व्हिडिओ व्हायरल, War 2 मधील रोमँटिक गाण्याचं शूटिंग
हृतिक रोशनच्या (Hrithik Roshan) आगामी 'वॉर २' (War 2) सिनेमाची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. सध्या हृतिक इटलीमध्ये सिनेमाच्या शूटमध्ये व्यस्त आहे. नुकतेच हृतिकचे सेटवरील काही फोटो व्हायरल झाले. यामध्ये तो अॅक्शन सीन्स शूट करताना दिसत आहे. तर आता हृतिक आणि किआरा अडवाणी (Kiara Advani) यांचाही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. दोघंही रोमँटिक गाण्याचं शूट करताना दिसत आहेत.
'वॉर २' मध्ये हृतिक रोशन-किआरा अडवाणी यांची फ्रेश जोडी दिसणार आहे. व्हिडिओत दोघंही इटलीच्या गल्ली बोळांमध्ये कॅज्युअल अंदाजात दिसत आहेत. किआरा गुलाबी रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. पळत येत ती हृतिकला मिठी मारताना दिसत आहे. दोघंही हातात हात घेऊन चालत आहेत. रोमँटिक गाण्याचं हे शूट असल्याची चर्चा आहे. दोघांचा व्हिडिओ व्हायरल होतोय.
hrithik and kiara, how beautiful they are together! 🤍 #hrithikroshan#Kiaraadvani#war2pic.twitter.com/NJ9zEgdipr
— Joe (@YoursJoee) September 24, 2024
मिड डे च्या रिपोर्टनुसार सिनेमात प्रीतमचं म्युझिक आहे. अयान मुखर्जी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. यामध्ये साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत आहे. पुढील महिन्यात सर्व क्रू भारतात परतणार आहे. तर 'वॉर 2' पुढील वर्षी १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.