“आम्हाला शिकवू नकोस”, हृतिकने शेअर केला एक्स-वाईफसोबतचा व्हिडीओ, कॅप्शन वाचून भडकले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 14:17 IST2023-03-08T14:15:21+5:302023-03-08T14:17:02+5:30
Hrithik Roshan : होय, होळीच्या दिवशीचा एक खास व्हिडीओ हृतिकने शेअर केला आहे. व्हिडीओ मजेदार आहे. पण या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन मात्र लोकांना अजिबात आवडलेलं नाही.

“आम्हाला शिकवू नकोस”, हृतिकने शेअर केला एक्स-वाईफसोबतचा व्हिडीओ, कॅप्शन वाचून भडकले नेटकरी
काल देशभर धुळवड साजरी झाली. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही जल्लोषात रंगांची उधळण केली. याचे एक ना अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हृतिक रोशन (Hrithik Roshan ) याने अगदी अनोख्या रितीने यंदाचा होळी सण साजरा केला. होय, होळीच्या दिवशीचा एक खास व्हिडीओ हृतिकने शेअर केला आहे. हा व्हिडीओ मजेदार आहे. पण या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन मात्र लोकांना अजिबात आवडलेलं नाही. अनेकांनी यावरून हृतिकला ट्रोल केलं आहे.
व्हिडीओत हृतिकची दाेन्ही मुलं रिहान व रिदान दिसत आहेत. हृतिक या व्हिडीओत आपल्या मुलासोबत टेनिस खेळताना दिसतोय. जवळच हृतिकची एक्स वाईफ सुजैन वर्कआऊट करतेय आणि तिचा बॉयफ्रेन्ड अर्सलान गोनी हा सुद्धा तिच्यासोबत आहे. सगळे वर्कआऊट करण्यात मग्न आहेत. “ना रंग ना भांग, बस पसीना बहाओ और फन करो... संपूर्ण कस्टमाइज्ड गँग होली मॉर्निंग वर्कआउट करतेय. तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा...,” असं कॅप्शन देत हृतिकने हा व्हिडीओ शेअर केला. नेमकं हेच कॅप्शन लोकांना खटकलं. यानंतर काय तर अनेकांनी हृतिकला ट्रोल करायला सुरूवात केली.
“जेव्हा तुमच्याकडे मर्यादेपेक्षा जास्त पैसा येतो, तेव्हा असं बकवास कॅप्शन लिहून कुल बनण्याचा प्रयत्न केला जातो,” अशी कमेंट एका युजरने केली. “असं बकवास कॅप्शन लिहिणं बंद कर, अन्य सणांबद्दल असं लिहू शकतोस का,” अशी संतप्त कमेंट अन्य एका युजरने केली. “आम्हाला शिकवू नकोस,” असंही एकाने लिहिलं. अर्थात अनेकांनी हृतिकचीही बाजू घेतली. “लोक इतके असहिष्णू का झालेत... तुम्हाला काय करायला हवं, हे तो सांगत नाहीये. त्याने होळीच्या दिवशी कसं एन्जाॅय केलं,” तोच व्हिडीओ त्याने शेअर केला आहे, असं म्हणत एका युजरने हृतिकची पाठराखण केली.