अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 11:29 IST2025-12-24T11:21:53+5:302025-12-24T11:29:48+5:30
हृतिकचा मुलांसोबतचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.

अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
अभिनेता हृतिक रोशनला सगळे 'ग्रीक गॉड' म्हणून ओळखतात. जगातील हँडसम अभिनेत्यांच्या यादीत हृतिकचा समावेश होतो. हृतिक रोशनला हृदान आणि हृहान ही दोन मुलं आहेत. दोन्ही मुलं आता मोठी झाली असून वडिलांसारखेच हँडसमही दिसतात. नुकतंच हृतिक कुटुंबासोबत एका लग्नसमारंभात सहभागी झाला होता. तिथे त्याने आपल्या दोन्ही मुलांसोबत डान्स केला. हृतिक प्रमाणेच त्याची मुलंही कमाल डान्स करतात हे पाहून चाहतेही चकित झाले.
हृतिक रोशनचा भाऊ ईशान रोशनचं काल लग्न झालं. भावाच्या लग्नात हृतिक स्टायलिश लूकमध्ये पोहोचला होता. त्याच्यासोबत गर्लफ्रेंड सबा आजादही दिसली. मात्र यावेळी हृतिकच्या हँडसम मुलांनी लक्ष वेधून घेतलं. दोघंही दिसायला उंच, गोरे आहेत. एकाने क्रीम शेरवानीत एन्ट्री घेतली तर दुसऱ्याने डार्क शर्ट, पँटमध्ये हजेरी लावली. तर हृतिक सूट बूटमध्ये हँडसम दिसत होता. इतकंच नाही तर बाप लेकांनी पंजाबी गाण्यावर ठेकाही धरला. 'इश्क तेरा तडपावे' गाण्यावर तिघांनी डान्स केला. हृतिक आणि मुलांच्या डान्सचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हृतिक आणि त्याच्या मुलांचा हा व्हिडीओ पाहून चाहते प्रभावित झालेत. 'बाप तशीच मुलं', 'किती हँडसम आहेत यार हे' अशा कमेंट्स व्हिडीओवर आल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
हतिकने २००० साली सुझैन खानशी लग्न केलं. २००६ साली सुझैनने हृदानला जन्म दिला. तर २००८ साली त्यांना दुसरा मुलगा झाला. बॉलिवूडमधलं आदर्श कपल म्हणून हृतिक आणि सुझैनचं नाव असायचं. मात्र दोघांनी लग्नानंतर १४ वर्षांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. तसंच हा घटस्फोट भारतातल्या सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक आहे असंही बोललं गेलं. सुझैनने हृतिकडून तगडी पोटगी घेतली अशी चर्चा झाली. घटस्फोटानंतर दोघांच्या आयुष्यात नवीन प्रेम आलं. सुझैन सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहे तर हृतिक सबा आजादसोबत दिसत आहे.