Zarine Khan Death: हृतिक रोशनची Ex पत्नी सुजैन खानच्या आईचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:11 IST2025-11-07T13:09:49+5:302025-11-07T13:11:18+5:30
Sussanne Khan's Mother Zarine Khan Dies: आईच्या निधनामुळे सुजैन खान आणि अभिनेता जायेद खान यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे

Zarine Khan Death: हृतिक रोशनची Ex पत्नी सुजैन खानच्या आईचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Zarine Khan Death: बॉलीवूडमधून एक दुःखद बातमी समोर येत आहे. अभिनेता हृतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खानच्या आईचं निधन झालंय. सुजैनची आई जरीन कतरक यांचं वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झालं आहे. जरीन या अभिनेता जायद खानची आई आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते संजय खान यांच्या पत्नी होत्या. शुक्रवारी, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून जरीन या वयोमानानुसार अनेक आजारांनी त्रस्त होत्या.
जरीन यांच्या निधनाची बातमी मिळताच खान कुटुंबीयांवर आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे. जरीन कतरक या खान कुटुंबाचा आधारस्तंभ होत्या. त्यांच्या पश्चात पती संजय खान आणि त्यांची मुले सुजैन, अरोरा, फराह आणि जायेद खान असा मोठा परिवार आहे.
जरीन कतरक यांनी फॅशन आणि डिझाइनच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी नेहमीच त्यांच्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना पाठिंबा दिला. जरीन यांनी त्यांच्या मुलांना यशस्वी करिअर करण्यासाठी कायमच पाठिंबा दिला. आईच्या निधनामुळे सुजैनने दुःख व्यक्त केलंय. याशिवाय त्यांच्या कुटुंबाने मीडिया आणि चाहत्यांना या कठीण काळात त्यांच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती केली आहे.